Home Breaking News छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनेक सामाजिक संघटनेच्या वतीने सावनेर येथे करण्यात आला...

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनेक सामाजिक संघटनेच्या वतीने सावनेर येथे करण्यात आला “राज्यभिषेक दिन”

106
0

आज दिनांक 6 जुन सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन जय शिवाजी सामाजिक संस्था मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड आणि इतर सामाजिक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ साजरा करण्यात आला.सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला जलाभिषेक करून महाराजांच्या स्मारकाला माल्यार्पण करण्यात आले व छत्रपती शिवरायांच्या जयघोष जय घोष करण्यात आला.याप्रसंगी छत्रपती शिवरायांनी रयतेचे राज्य निर्माण करून तमाम रयतेला न्यायाचं न्यायप्रिय राज्य दिलं शेतकऱ्यांना महिलांना पुरुषांना आत्मविश्वास दिला बळ दिलं अशा या युग प्रवर्तक ऐतिहासिक दिनाचा न भूतो न भविष्यती शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन भावी पिढीने छत्रपतींचा आदर्श घेऊन छत्रपतींच्या स्वराज्याची संकल्पना कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करावा असे प्रतिपादन दिनेश इंगोले अध्यक्ष जय शिवाजी शिवाजी सामाजिक संघटना यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी उपाध्यक्ष प्रशांत ठाकरे,सचिव गजू कोमुजवार,रमेश वानखेडे,सुभाष गावंडे,पंकज घाटोळे,संजय राऊत,जामुवंत वारकरी,गेंद्रराज जिचकार,सुधाकर ढोबळे,शकील झेडिया,कांचन ढवंगाळे,राजू सोनटक्के,सुधीर वानखेडे,मिलिंद बले,मयूर नागदवने,गजुजी चौधरी,वातुजी पाचभावे,दीपक भुडके आदि मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here