गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा आज दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी कळमेश्वर येथे संपन्न झाला. मुख्य बाजार आवारात व्यापारी गाळे आणि ७५० मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामाचे तसेच उपबाजार आवार ब्राम्हणी येथे प्रशासकीय इमारत, कार्यालय व चेकपोस्टच्या बांधकामाचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री मा. सुनील केदार यांच्या शुभहस्ते पार पडले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्यामकुमार बर्वे होते.कार्यक्रमाचे आयोजन सहकार महर्षी बाबासाहेब केदार शेतकरी सभागृह, संत्रा मार्केट, कळमेश्वर येथे करण्यात आले.
कार्यक्रमास मुक्ता कोकड्डे (माजी अध्यक्षा, जि.प. नागपूर), बाबाराव कोढे (अध्यक्ष, ख.वि. सहकारी संघ), प्रभाकर भोसले, महेंद्र डोंगरे, जयश्री वाळके, विजय भांगे, कुंदा राऊत,पिंकी कौरती,अश्विन बैस, श्रावण भिंगारे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
तसेच प्रमुख उपस्थितांमध्ये अनिल डांगोरे, मालती वसु, वंदना मोरे, राम काळे, किशोर मोहोड, लक्ष्मण हेलोंडे, विभा निंबाळकर, देवेन्द्र पन्नासे, अविनाश गोतमारे, आशिष देशमुख, अभय फुटाने, विरेंद्रसिंह बेस, अरविंद रामावत, निळकंठ भोस्कर, शोभा कौटकर, ज्योत्सना मंडपे, वैभव घोंगे, सुषमा वानखेडे, नरेन्द्र पालटकर, तेजराम नाखले, राजेन्द्र सुके, मनोज मांडवगडे यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाचे आयोजन सभापती बाबा पाटील, उपसभापती प्रतिभा पालटकर तसेच संचालक मंडळाचे शंकर देशमुख, वासुदेव निंबाळकर, विजय ठाकरे, काशीराव भक्ते, जिजा निंबाळकर, प्रदीप चनकापुरे, राजेश माडेकर, विनोद पवार, संजय ठाकरे, प्रशांत निंबाळकर, प्रभाकर रानडे, नरेश शांताराम गोतमारे, माधुरी श्रीखंडे, सुधिर पोहनकर, ज्ञानेश्वर काळे यांनी संयुक्तरित्या केले.
या सोहळ्यास स्थानिक शेतकरी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या नव्या प्रकल्पांमुळे बाजार समितीची सेवा-सुविधा बळकट होणार असून स्थानिक शेती व व्यापार क्षेत्राला नवे बळ मिळणार आहे.
Home Breaking News कृषी उत्पन्न बाजार समिती,कळमेश्वर तर्फे व्यापारी गाळे,गोदाम व प्रशासकीय इमारतींच्या बांधकाम प्रकल्पांचे...




