(सावनेर तालुका प्रतिनिधी)
सावनेर तालुक्यातील ग्रामपंचायत सावळी (मो) या गावाची निवड भारत सरकारच्या “आदी कर्मयोगी अभियान” या उपक्रमासाठी करण्यात आली असून, या अभियानाच्या कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. हे अभियान जनजातीय कार्य मंत्रालयाद्वारे राबवले जात असून, आदिवासी समुदायाला सक्षम करून त्यांचा सर्वांगीण विकास साधणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.
उद्घाटन कार्यक्रमाला सहा.गटविकास अधिकारी ज्योती जातगडे मॅडम,शिक्षण विभागाचे जितेंद्र ठाकरे सर, बांधकाम विभागाचे श्री ज्ञानेश्वर मगर, ICDS पर्यवेक्षिका सारिका चितखेडे, सरपंच सुनीता मोहतकर, उपसरपंच रवींद्र काकडे, ग्रामसेविका जयश्री नागमोते, जिल्हा परिषद शिक्षक निकोसे सर, शिक्षिका चांदेकर मॅडम, तलाठी फुकट, हरीष मोहतकर, नानाजी माडेकर तसेच पोलीस पाटील देवराम मोहतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अभियानाचे उद्दिष्ट्येआदिवासी सक्षमीकरण: आदिवासी समाजाला सक्षम व स्वावलंबी बनवणे.स्थानिक नेतृत्व विकास: आदिवासी तरुणांमध्ये नेतृत्वाची नवी पिढी निर्माण करून त्यांना विकासासाठी संधी उपलब्ध करून देणे.प्रतिसादात्मक शासन: शासनाच्या विविध योजना आदिवासी भागातील प्रत्येक घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे.गावपातळीवरील विकास: प्रत्येक गावाचा सविस्तर विकास आराखडा तयार करून विविध योजनांचे समन्वय साधणे.अभियानांतर्गत सावळी (मो) गावात सर्वांगीण पाहणी करून विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.
तसेच गावकऱ्यांना विविध वैयक्तिक योजनांची माहिती देण्यात आली. या उपक्रमाद्वारे तळागाळातील आदिवासी समाजात नेतृत्व गुण विकसित होऊन, सरकारी योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.




