Home Breaking News सावनेर येथील स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनापुढे वाचला समस्यांचा पाढा

सावनेर येथील स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनापुढे वाचला समस्यांचा पाढा

44
0

सावनेर
नगरपालिकेच्या निवडणुका होत नसल्याने नगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.यावर आवाज उठवायला लोकप्रतिनिधी नाहीत तर दुसरीकडे प्रशासकांसमोरही आवाहन उभे ठाकले आहेत प्रशासकाला नागरिकांच्या समस्या सोडवताना काही अडचणी आहेत का प्रशासकाच्या मर्यादा काय आहेत असेही प्रश्न उभे राहिले आहेत.शहरात मात्र अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत  पावसाच्या दिवसात निर्माण होणाऱ्या समस्या गढूळ पाणी,वाढलेले गवत,डासांचा प्रादुर्भाव,घनचक्रा व्यवस्थापन,मोकाट जनावरे,रस्त्यावरील खड्डे भरणे आदी समस्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत.पालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी 
भाजपच्या वतीने पालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या अनुषंगाने  आयोजित बैठकीप्रसंगी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शहरातील समस्यांचा पाढाच वाचून दाखवत साहेब जरा नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे तरी लक्ष द्या अशी मागणी करण्यात आली. 
यावेळी नगरपालिका प्रशासक संपत खलाटे,मुख्याधिकारी सुमेध अलोने,रामराव मोवाडे,भाजपा मंडळ अध्यक्ष मंदार मंगळे,तुषार उमाटे,राजू घुगल,दिवाकर नारेकर,रवींद्र ठाकूर, रितेश सूर्यवंशी,आशिष मानकर,अरविंद ताजने,पिंटू सातपुते,मनीष खंगारे,प्रज्वळ कांबळे,विजय लाड,अंकित भोपे,कुलभूषण नवदिंगे,रत्नाकर ठाकरे,अंकित भोपे,राधेश्याम उलमाले,मोहन कानफाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. गुंठेवारी प्रकरणातील अडचणी,घनकचरा व्यवस्थापन,पावसाळ्यात मुरूम,चुरी टाकून, वाढलेल्या गवतावर तणनाशक फवारणी करणे,मोकाट जनावरांची व्यवस्था करणे,स्वच्छ पाणी पुरवठा करणे,शहरात असलेले हॅडपंप दुरुस्ती करणे,धोकादायक झाडांची कटिंग करणे,व्यायामशाळा दुरुस्ती करणे,डासांचा प्रादुर्भाव कमी करणे आदी विषयांवर चर्चा झाली.यावेळी अधिकाऱ्यांनी सुद्धा समस्या जाणून घेतल्या आणि यावर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here