सावनेर प्रतिनिधी
दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी सावनेर रेल्वे स्टेशन परिसरात भुकेच्या शोधात आलेला एक अल्पवयीन मुलगा स्थानिक नागरिकांना आढळून आला. नागरिकांनी ही माहिती सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड तसेच सावनेर पोलीस स्टेशनला दिली. तत्काळ सावनेर पोलीस स्टेशनचे नाईट ऑफिसर नंदू मेश्राम घटनास्थळी दाखल झाले व मुलाला विश्वासात घेऊन आवश्यक चौकशी करण्यात आली.चौकशीत मुलाने आपले नाव व छत्तीसगडमधील भिलाई येथील राहण्याचे ठिकाण सांगितले.
यानंतर हितज्योती आधार फाउंडेशनच्या टीममार्फत छत्तीसगड येथील सदर संस्थेच्या सदस्य निकिता मिलिंद यांच्याशी संपर्क साधण्यात आला. निकिता यांनी भिलाई येथील रिसाली पोलीस स्टेशनशी संपर्क साधून या मुलाबाबतची माहिती दिली असता, तेथे या मुलाचा हरवलेल्यांचा (missing) अहवाल आधीच नोंदविण्यात आलेला असल्याचे समोर आले.
यानंतर मुलाच्या वडिलांशी संपर्क साधून त्यांना संपूर्ण माहिती देण्यात आली. २ ऑक्टोबर २०२५ रोजी मुलाचे वडील सावनेर पोलीस स्टेशनला आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सावनेर पोलिसांच्या उपस्थितीत मुलाला त्याच्या वडिलांच्या ताब्यात सोपविण्यात आले.मुलाचा सुरक्षित परतावा झाल्याबद्दल मुलाच्या वडिलांनी सावनेर पोलिसांचे तसेच हितज्योती आधार फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
Home Breaking News छत्तीसगडमधील हरवलेला मुलगा सावनेर पोलिस व हितज्योती आधार फाउंडेशनच्या मदतीने सुखरूप घरी...




