गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर
ओबीसी जिल्हा काँग्रेसचा मेळावा व नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी संत सावता मंदिर सभागृह, कळमेश्वर येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नागपूर जिल्हा काँग्रेस ओबीसी प्रभारी प्रकाश जानकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष किशोर कन्हेरे, तसेच सचिव याज्ञवल्क्य जिचकार उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन सतीश अढावू, अध्यक्ष नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी केले होते. तसेच उपाध्यक्ष मेघा वैरागडे, कार्याध्यक्ष नितीन सातनूरकर, नरखेड तालुका अध्यक्ष कृष्णा शिंडे, काटोल तालुका अध्यक्ष घनश्याम राऊत आणि जिल्ह्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी नव्याने नियुक्त झालेल्या सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मेघा वैरागडे यांनी केले, तर कृष्णा शेंडे यांनी आभार प्रदर्शन केले.




