Home Breaking News कान्होलिबारा सर्कलमधून शिक्षित आणि समाजाभिमुख महिला नीलम चकोले पंचायत समिती निवडणुकीस सज्ज...

कान्होलिबारा सर्कलमधून शिक्षित आणि समाजाभिमुख महिला नीलम चकोले पंचायत समिती निवडणुकीस सज्ज !

43
0

(हिंगणा तालुका प्रतिनिधी)
कान्होलिबारा गावातील रहिवाशी नीलम देवानंद चकोले या शिक्षित, उद्योजक आणि समाजाभिमुख महिला असून, त्यांनी मागील १२ वर्षांपासून “नीलम मोटर्स” या नावाने २ चाकी वाहनांचे शो रूम यशस्वीपणे चालविले आहे. त्यांच्या ग्राहकांची व्याप्ती फक्त कान्होलिबारा पंचायत समिती पुरती मर्यादित नसून संपूर्ण जिल्हा परिषद सर्कलपर्यंत पसरलेली आहे.
नीलम चकोले यांनी गेल्या ५ वर्षांपासून जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी केली होती, मात्र सर्कल अनुसूचित जमाती महिला आरक्षणासाठी राखीव झाल्याने त्यांनी आता पंचायत समिती निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या हिंगणा पंचायत समितीअंतर्गत कान्होलिबारा सर्कल मधून सर्वसाधारण महिला वर्गातून उमेदवारी सादर करण्याचा विचार करत आहेत.
कान्होलिबारा हेच त्यांचे जन्मगाव असल्याने त्या गावाचा आणि सर्कलमधील सर्व गावांचा त्यांना सखोल अभ्यास आहे. त्यांना कुटुंबीय आणि मित्रपरिवाराचाही जोरदार पाठिंबा लाभत आहे. त्यांच्या परिवारातही राजकीय जाण असलेले सदस्य आहेत. सामाजिक कार्याची आवड असल्याने नीलम चकोले या गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेत सक्रिय आहेत आणि आगामी काळातही हे कार्य सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here