मौदा (तालुका प्रतिनिधी)
बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीए यांना मिळालेल्या अभूतपूर्व जनादेशाने मौदा तालुक्यातील चाचेर येथील भाजप कार्यालयात प्रचंड उत्साह संचारला. “अबकी बार 200 पार, फिर एक बार मोदी एनडीए सरकार” अशा घोषणांसह कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी फोडून, मिठाई वाटून विजयाचा जल्लोष साजरा केला.
बिहारमध्ये एनडीए ला मिळालेल्या दणदणीत यशामुळे स्थानिक पातळीवरही कार्यकर्ते उत्साहित झाले आहेत. चाचेर येथील भाजप कार्यालयात हा विजय उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी माजी जि.प.सदस्य कैलास बरबटे, संजू वाघमारे, कैलास सोमनाथे, अशोक बावनकुळे, किष्णा टिकले, मोतीराम घरझाडे, विकास झाडे, केशव झाडे, राहूल सोमनाथे, मेघेश्माम कुलकार, किरण बरबटे, धनराज हारोडे, सुभाष खेरगडे, सुरेश भिलकर, लीलाधर कुथे, प्रमोद ठाकरे, राहुल मेक्षाम, रजत महादुले, हर्षद बावणे, अजय वाघमारे, रवी झाडे यांच्यासह भारतीय जनता पार्टी आणि महायुती मित्रपक्षांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीए च्या नेतृत्वाचे कौतुक करताना बिहारातील जनतेच्या विश्वासाला सलाम केला. हा विजय देशभरातील विकासाच्या लाटेचे प्रतीक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. उत्सवात ढोल-ताशांच्या गजरात नाचणाऱ्या कार्यकर्त्यांनी कार्यालय परिसर दुमदुमून सोडला.




