Home अपराध अवैधरित्या सुपारी (अरेका नट) ची वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूध्द कारवाई, ३ वाहने आणि...

अवैधरित्या सुपारी (अरेका नट) ची वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूध्द कारवाई, ३ वाहने आणि ३७,०५० किग्रॅ सुपारी किंमती ७९ लाख १० हजार १७५ रूपयांचा मुद्देमाल जप्त, सावनेर पोलीसांची कामगिरी

31
0

दिनांक १२/११/२०२५ रोजी सावनेर पोलीसांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशिर माहीती मिळाली की मौजा हेटी शिवारातील श्री विर तेजाजी राजस्थानी भोजनालय येथे तिन ट्रक मध्ये सुपारी (अरेका नट) भरून दिल्लीला नेत आहेत. अशा माहीतीनुसार सावनेर पोलीसांनी तात्कळ घटनास्थळी पांढूर्णा ते सावनेर हायवे वरील श्री विर तेजाजी राजस्थानी भोजनालय, हेटी येथे जावुन पाहणी केली असता तिथे तिन ट्रक उभे होते. सदर ट्रकचे चालक यांना सदर ट्रक मध्ये काय आहे? याबाबत विचारले असता त्यांनी ट्रक मध्ये सुपारी असल्याचे कबूल केले. त्यानंतर सदर ट्रकची पाहणी केली असता १) अशोक लेलँड कंपनी ट्रक क. के ए. १९ ए. एफ. ४२५५ मध्ये १२,३५० किग्रॅ सुपारी २) अशोक लेलँड कंपनी . के ए. १९ ए. ई ४९४५ मध्ये १२,३५० किग्रॅ सुपारी ३) आयशर कंपनीच ट्रक कं. के ए. १९ ए. ई ९४३८ मध्ये १२,३५० किग्रॅ सुपारी माल भरून आढळून आला व तिन्ही ट्रक मधील सुपारी (Arecanut) एकूण वजन ३७,०५० किग्रॅ किंमत ७९,१०,१७५/- रूपये मिळुन आले. नमुद तिन्ही वाहनांमधुन पंचासमक्ष सुपारी चे सॅम्पल फॉरेन्सिक परिक्षण करण्यासाठी पाठविण्यात आले तसेच नमुद तिन्ही वाहन आणि मुद्देमाल अन्न व औषधी प्रशासन अधिकारी, नागपूर यांना पुढील कार्यवाही करणे कामी ताब्यात देण्यात आले आहे. वाहन चालकांची नावे अनुक्रमे १ मोहम्मद शरीफ, वय ४४ वर्षे, रा. मंगलोर, २. इलियाजअहमद, वय ४८ वर्षे, रा पाडानगड्डी, दक्षिण कन्नडा, राज्य कर्नाटक, ३. मोहम्मद इब्राहिम मुक्तार, वय २६ वर्षे, रा बंतवाल, राज्य कर्नाटका अशी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here