Home Breaking News राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाचे केंद्रीय गृहमंत्री मा.अमित शाह यांच्या हस्ते भूमिपूजन

राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाचे केंद्रीय गृहमंत्री मा.अमित शाह यांच्या हस्ते भूमिपूजन

83
0

नागपूरसारख्या शिक्षणनगरीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. जगातील पहिले आणि एकमेव राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ आता विदर्भात उभारले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री मा.अमित शाह यांच्या हस्ते, तसेच मा. नितीन गडकरी आणि मा. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, या विद्यापीठाच्या भूमिपूजन सोहळ्यात सहभागी होता आलं, ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.
कामठी तालुक्यात ५० एकर क्षेत्रात हे विद्यापीठ उभारले जाणार असून, फॉरेन्सिक सायन्स व सायबर सुरक्षेतील पाच अभ्यासक्रम २०२५ पासून सुरू होणार आहेत. हे संस्थान महाराष्ट्राला सक्षम तज्ज्ञांची नवी फौज देईल आणि न्यायप्रक्रिया अधिक आधुनिक होईल. नागपूरसाठी ही एक अभूतपूर्व शैक्षणिक झेप ठरणार आहे!
या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, एनएफएसयूचे कुलगुरू डॉ. जे. एम. व्यास, संबंधित अधिकारी व अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here