नवनाथ आश्रमात महिला भाविकांची मोठी गर्दी
मौदा/सावनेर
सावनेर पासून 15 की मी अंतरावर असलेल्या तेलनगखेडी येथील कोलार धरणाच्या काठी स्थापित असलेल्या नवनाथ आश्रमात ऋषीपंचमी निमित्य आंघोळीसाठी महिला भाविकांची मोठी गर्दी होती या ठिकाणी असलेल्या नवनाथ मंदिर,दत्तमंदित ,आणि शिवमंदिर येथे महिलांनी पूजा अरच्या करून मनोभावे पूजा केली तसेच वनभोजन केले यावेळी नवनाथ आश्रम सेवा समितीचे पदाधिकारी वामन झोटिंग,अशोक हिवरकर,प्रवीण गिरडे,रमेश नेहा रे यांनी भाविकांची विशेष वेवस्था केली केलवद पोलिसांनी महिलांची गर्दी लक्षात घेता चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता पोलीस पाटील सौ रंजना हिवरकर यांचेसह अनेक महिला पोलीस कर्मचारी दिवसभर आश्रम परिसरात उपस्थित होत्या




