दिनांक १३/११/२०२५ रोजी कळमेश्वर पोलीसांना गुप्तबातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की मौजा माहुहारी शिवार येथे काही इसम ५२ ताशपत्तयांचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस घटनास्थळी पोहचुन धाड टाकली असता आरोपी नामे १) शिवराज वासुदेव बावनकर, वय ४० वर्ष, रा. पंचदीपनगर अनुभव कॅलनी, सोमलवाडा, नागपुर २) गणेश शिवाजी बोरकर, वय ४० वर्ष, रा. पार्वती नगर, नागपुर ३) भुषण दिनेश देव्हारे, वय ४० वर्ष, रा. दिघोरी, नागपुर ४) अब्दुल गुलाम साबीर अब्दुल रहीम, वय ४९ वर्ष, रा. गाजीपेठ, नागपुर ५) अनिल धनसुलाल नंदवसी, वय ४९ वर्ष, रा. भवानी मंदीर जवळ, पारडी, नागपुर ६) प्रवीण विष्णु परिहार, वय ४६ वर्ष, रा. गोळीबार चौक, नागपुर ७) नितीन विष्णु परिहार, वय ४४ वर्ष, रा. गोळीबार चौक नागपुर ८) सचीन समाधान डोंगरदिवे, वय ३८ वर्ष रा सुरेन्द्रगड बगजरंग चौक नागपुर ९) आशिष द्वारकाप्रसाद साहु वय ३२ वर्षे रा. पिपळा फाटा बस स्टॉप जवळ हुडकेश्वर नागपुर १२) सुमीत बाबाराव डोंगरदिवे, वय ३३ वर्ष, रा. सुरेन्द्रगड, हजारी पहाड नागपुर ११) रितेश सजय पांडे, वय ३२ वर्ष, रा. तिरंगा चौक, सक्कदरा, नागपुर १२) राहुल महाविर जांगीळ, वय ३२ वर्ष, रा. ओमकार लॉन जवळ, दिघोरी, नागपुर हे ५२ ताशपत्तयांचा जुगार खेळतांना मिळुन आले. आरोपीतांच्या ताब्यातुन ५२ तास पत्ते व रोख रक्कम ३२,४३०/- रूपये जप्त करण्यात आले आहे. नमुद आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे १२ म जु का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Home अपराध अवैधरित्या ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या १२ आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद कळमेश्वर पोलीसांची कामगिरी




