Home Breaking News गणेशपेठ नागपूर मध्यवर्ती एसटी बस स्थानकावरील विविध समस्या व दुरावस्था – विभागीय...

गणेशपेठ नागपूर मध्यवर्ती एसटी बस स्थानकावरील विविध समस्या व दुरावस्था – विभागीय नियंत्रकांना निवेदन

165
0

मौदा (ताप्र) : पुणे येथील स्वार गेट बस स्थानक परिसरात शिवशाही बस मध्ये तरुणीवर अत्याचाराची घटना दि. २६ फेब्रुवारी रोजी घडल्याने संपूर्ण महाराष्ट्रात महिलांचे मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एसटी प्रशासना विरोधात रोष व्यक्त होत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता दि.२८ फेब्रुवारी रोजी अ.भा. ग्राहक पंचायत, नागपूर महानगर च्या वतीने विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गणेश पेठ नागपूर यांना नागपूर एसटी बस स्थानकावरील विविध समस्या व तेथील दुरवस्थाचे निवेदन देण्यात आले.
नागपूर येथील गणेश पेठ मध्यवर्ती बस स्थानक परिसरात अपुरी लाईट व्यवस्था, अर्धवट बांधकाम, अपरे सुरक्षा गार्ड, तसेच मुख्यद्वार मधून बसेस आत प्रवेश करतात त्या गेट चे बाजूला अर्धवट बांधकाम झाले त्याठिकाणी जी खाली जागा आहेत तेथे अवैध्य ऑटो रिक्षा, कार पार्क करतात तेथे काळोख असतो काळोखाचा फायदा घेऊन अवैध्य धंदे चालतात, दारु पितात आणि तेथून महिला प्रवासी रात्री जात असतात. तेंव्हा त्यांना भीती वाटते असे अवैद्य ऑटो रिक्षा उभी करु देऊ नये. याठिकाणी काळोख असतो येथे तातडीने लाईट ची व्यवस्था करावी. तसेच सुरक्षा गार्ड ठेवावे रात्री सुरक्षा गार्ड दिसत नाही. गणेश पेठ नागपूर बस स्थानक मध्ये ज्या बसेस रात्री मुक्कामी असतात त्या सर्व बसेस ची तपासणी सुरक्षा गार्ड कडून नियमीत करावी, बस पूर्णपणे लॉक (कुलूपबंद)असावी कुणीही व्यक्ती (चालक वाहक) बस मधे नसावा. तसेच चालक वाहक यांना रात्रीचा मुक्काम बस मध्ये करु देऊ नका त्यांना आराम करण्या करिता स्वतंत्र रुमची व्यवस्था करुण द्यावी. तसेच रात्रीचा मुक्काम असल्यास महीला वाहक यांना स्वतंत्र रुम ची व्यवस्था असावी व महीला वाहकांना सुरक्षित वातावरण असावे

गणेश पेठ बस स्थानक परिसरात पूर्वी सायकल, स्कूटर स्टँड होते प्रवासी ग्राहक आपल्या सायकली, स्कूटर स्टँड वर ठेवत होते पण गेल्या काही वर्षापासून एसटी चे अधिकृत सायकल स्कूटर स्टँड नसल्यामुळे प्रवासी ग्राहकांना अवैध्य सायकल स्कूटर स्टँड वर वाहने ठेवावी लागतात तसेच महिलांकरिता अवैध्य सायकल स्कूटर स्टँड सुरक्षित नाही. कारण त्या परिसरात असामाजिक तत्वाचे लोक फिरत असतात. अशा हलगर्जी व्यवस्थेमुळे माहीला प्रवासी ग्राहक सुरक्षित नाही. म्हणून तातडीने प्रवासी ग्राहकांना एसटी चे अधिकृत सायकल स्कूटर स्टँड उपलब्ध करून द्यावे.
प्रवाशांना पैशाचे मोबदल्यात चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देणे हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चे कर्तव्य आहेत. ग्राहक हिताय ग्राहक सुखाय व “बहुजन हिताय बहुजन सुखाय” हे एसटी चे ब्रीद वाक्य आहे. आता बस मधे दिसत नाही. याचा विसर प्रशासनाला पडला की काय असा प्रश्न निर्माण होतो. असेच अनेक प्रश्न पुणे येथील स्वार गेट बस स्थानक मधील शिवशाही बस मधील घडलेल्या महिले वरील अत्याचाराने पुढे आली आहेत.
जुन्या बसेस अजूनही रस्त्यावर धावत आहे, शिवशाही बसेस या गंभीर आजाराने ग्रस्त आहे, अशी स्थिती बसची आहे. बसेसची देखभाल व दुरुस्ती होत नाही. चालक वाहकांच्या सूचनेकडे व तक्रारीकडे अधिकारी दुर्लक्ष करतात. असे चालक वाहक सांगतात. तर कर्कश आवाजामुळे एसटी मध्ये बसणारे ग्राहक त्रस्त असतात.
गणेशपेठ एसटी बस स्थानक बाहेर २०० मीटर पर्यंत अवैद्य प्रवासी वाहने उभी ठेऊ नये असा नियम आहेत्. पण गणेश पेठ बस स्थानक परिसर अवैध्य वाहनाने वेढलेला आहेत तसेच दोन्ही मुख्य प्रवेशद्वार पुढें हातगाडी दुकाने, ऑटो रिक्षा उभा असतात एसटी चालकांना गाडी आत व बाहेर नेताना कसरत करावी लागतात अशा वेळेस चालकांची नजर चूक झाल्यास अपघात होऊ शकतो. तरी यावर योग्य ती कारवाई करावी. अशा मागणीचे निवेदन अ.भा. ग्राहक पंचायतचे अध्यक्ष अनिवृध्द गुप्ते व महानगर सचिव विलास ठोसर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here