टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित 6वी राष्ट्रीय सिनियर टेनिस क्रिकेट स्पर्धा
पानिपत क्रीडा संकुलन, हरियाणा (पानिपत ) येथे उत्साहात संपन्न झाली.यामध्ये हरियाणा संघाला सुवर्णपदक द्वितीय क्रमांक महाराष्ट्र व तृतीय क्रमांक मध्य प्रदेश ला मिळाल्याबद्दल सर्व राज्य तून खेळाडूंचे अभिनंदन होत आहे.
या स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैया गुजर, राष्ट्रीय महासचिव मीनाक्षी गिरी हरियाणा सचिव कश्मीर सिंग टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया उपाध्यक्ष पंकज सावंत आदि मान्यवर उपस्थित होते.
या टूर्नामेंटमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणारे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित राहतील, या टूर्नामेंटची दोन टीम तयार होईल, जो पोलँड आणि रशियामध्ये सहभागी होईल तसेच ड्रीम लीग ऑफ इंडिया या, लीग मध्ये खेळाडूंना संधी मिळणार आहे अशी माहिती आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष कन्हैया गुजर यांनी सांगितले.
तसेच भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनचे महासचिव मीनाक्षी गिरी यांनी विद्यार्थ्यांना टेनिस क्रिकेट खेळाबद्दल माहिती व त्याचे महत्त्व सांगितले. या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून मुलांचे 12 संघ उपस्थित होते.
टेनिस क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना हरियाणा विरुद्ध महाराष्ट्र असा झाला. यामध्ये हरियाणा च्या खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे नेत्रदीपक कामगिरी करत संघाला विजयश्री मिळवून दिला.परंतु, महाराष्ट्र संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले , तृतीय क्रमांक mp संघाला मिळाल्याबद्दल महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या सचिव मिनाक्षी गिरी, महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे उपाध्यक्ष विलास गिरी संदीप पाटील, सिद्धेश गुरव, महेंद्र देशमुख महाराष्ट्र पहिला अध्यक्ष धनश्री गिरी नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी अभिनंदन केले व आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या
या सर्वांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
Home Breaking News राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला द्वितीय पारितोषिक तर मध्य प्रदेश...




