Home Breaking News शिवगर्जना युवा प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा

शिवगर्जना युवा प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा

40
0

हिंगणा
शिवगर्जना युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित नववा दहीहंडी उत्सव दिनांक सोळा ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता ग्रामीण रुग्णालयासमोर, वार्ड क्रमांक पंधरा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास आमदार समीर मेघे यांनी उपस्थित राहून आयोजकांना शुभेच्छा दिल्या. या वेळी अनेक बालगोपालांनी कृष्ण व राधा यांच्या वेषात पालकांसोबत आनंदाने सहभाग नोंदविला. “हाथी घोडा पालखी, जय हो नंदलाल की” अशा गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
उत्सवाचे औचित्य साधून आयोजकांनी हिंगणा नगर पंचायत उपाध्यक्षा सौ. प्राजक्ता गजबे, सभापती सौ. सुचिता चामाटे, संजयभाऊ शिंगणे, रमेश कण्हेरे, सुरेश गोबाडे, सूरज नेहारे , विपिन काकडे , बंडूभाऊ चव्हाण , देशमुख साहेब , सदाफळे काका , यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. सर्व लहान बालगोपालांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे बालगोपालांच्या हस्तेच दहीहंडी फोडण्यात आली.
या उत्सवाचे आयोजन शिवगर्जना युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंकज गजबे , सौरभ खाडे, पंकज चामाटे, अक्षय वानखेडे, अविनाश चव्हाण, समीर सातपुते, साहिल ढवळे, गुड्डू रंदइ , अभीशेख चामाटे व मित्र परिवाराने केले होते. स्थानिक पोलिस विभागाने वाहतुकीची कोंडी व इतर समस्या उदभऊ नये म्हणून आपली सेवा दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here