Home सांस्कृतिक व सामाजिक शिवतीर्थ टुरिझम येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी – सांस्कृतिक उपक्रमांतून आदर्शांचा जागर

शिवतीर्थ टुरिझम येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी – सांस्कृतिक उपक्रमांतून आदर्शांचा जागर

89
0

गिरीश आंदे
संस्कार, शौर्य आणि स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त सावनेर तालुक्यातील उमरी येथील शिवतीर्थ टुरिझम येथे सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्यात राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे विविध सांस्कृतिक व प्रेरणादायी उपक्रम सादर करण्यात आले. इतिहासातील त्यांच्या कार्याची महती, मातृत्वातून घडलेले नेतृत्व आणि स्वराज्यनिर्मितीतील योगदान यावर आधारित कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
शिवतीर्थ टुरिझमचे संस्थापक डॉ. अभिविलास नखाते यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक समाजसेवी, युवक-युवती तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
कार्यक्रमात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले असून, राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश यशस्वीपणे साध्य झाल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here