Home राजकीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सावनेर शहर अध्यक्षपदी गोपाल घटे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सावनेर शहर अध्यक्षपदी गोपाल घटे यांची नियुक्ती

35
0

राहुल सावजी (सावनेर तालुका प्रतिनिधी)
पक्ष विस्ताराचा ध्यास घेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार गट) आपल्या संघटनात्मक रचनेत मोठे फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर, सावनेर शहरातील पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी गोपाल घटे यांची सावनेर शहर अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.
या नियुक्तीमुळे सावनेरच्या राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनुभवी नेतृत्वावर सोपवली जबाबदारी गोपाल घटे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. शहरातील स्थानिक समस्या असोत किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न, त्यांनी नेहमीच आक्रमकपणे आवाज उठवला आहे. त्यांच्या याच कार्यशैलीची आणि संघटनात्मक कौशल्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्याकडे शहराची धुरा सोपवली आहे. त्यांच्या निवडीमुळे पक्षाला सावनेर नगरपरिषद आणि इतर आगामी निवडणुकांमध्ये मोठी उभारी मिळेल, असा विश्वास वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना गोपाल घटे म्हणाले, “पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. सावनेर शहरातील सामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवणे, रखडलेली विकासकामे मार्गी लावणे आणि पक्षाची विचारधारा घराघरांत पोहोचवून संघटन बळकट करणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट राहील.
” या निवडीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने चंद्रशेखर कावडकर, दिलावर शेख, शांताराम अंतुरकर, सोमेश्वर भुसारी. मनोहर घटे, प्रदीप घटे, जयंत घटे, शमीम कुरेशी, सुभाष मछले, प्रशांत ठाकरे, मोहन कानफाडे, विजय रडके, रोशन वानखडे, आशिष माटे, योगेश्वर वाळबुदे, सुभाष शेंबेकर, देवराव राऊत, भगवान गायकवाड, तुषार गायकवाड, सोनबा ठाकरे या सर्व पदाधिकाऱ्यांनी गोपाल घटे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या निवडीमुळे सावनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याला आता नवी गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here