Home Breaking News महासम्राट बळीराजाच्या रथयात्रेचे सावनेरमध्ये जल्लोषात स्वागत – मा.मंत्री सुनील केदार यांची भेट

महासम्राट बळीराजाच्या रथयात्रेचे सावनेरमध्ये जल्लोषात स्वागत – मा.मंत्री सुनील केदार यांची भेट

147
0

डॉ.अभिविलास नखाते यांच्या संकल्पनेतून आयोजित महा सम्राट बळीराजा रथयात्रा २०२५ ही गुरुकुंज मोझरी ते शिवतीर्थ उमरी दरम्यान ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडत आहे. या यात्रेचा समारोप कार्यक्रम उद्या दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी निर्धारित असून, त्या अनुषंगाने रथयात्रा संध्याकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास सावनेर येथे आगमन झाले.या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री सुनील केदार, नगरपरिषद माजी उपाध्यक्ष गोपाल घटे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित राहून यात्रेचे स्वागत केले.
सावनेर परिसरात रथयात्रेच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती.महा सम्राट बळीराजा रथयात्रा ही सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचे प्रतीक ठरत असून, विविध ठिकाणी उत्साह, एकता आणि जनजागृतीचा संदेश देत यशस्वीपणे मार्गक्रमण करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here