Home Breaking News ट्विंकल किड्स कॉन्व्हेंट अँड प्ले-स्कूल येथे ८वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

ट्विंकल किड्स कॉन्व्हेंट अँड प्ले-स्कूल येथे ८वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

58
0

गिरीश आंदे
दिनांक ५ फेब्रुवारी २०२६, गुरुवार रोजी ट्विंकल किड्स कॉन्व्हेंट अँड प्ले-स्कूल, सावनेर येथे शाळेचे ८वे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडले.
“शिक्षणासोबतच संस्कारांची जोड मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या विचार, स्वभाव व वर्तनात सकारात्मक बदल घडून येतो. आमच्या शाळेत अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांवर संस्कार घडविण्यावर विशेष भर दिला जातो,” असे प्रतिपादन शाळेच्या डायरेक्टर श्रीमती शर्मिला प्रफुल कष्टी यांनी केले. त्या स्नेहसंमेलनप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नत्थू कष्टी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून राजू घुगल (उपाध्यक्ष, सावनेर नगर परिषद) उपस्थित होते. तसेच आशिष मानकर,योगिता घोरमारे,वनिता घुगल (नगर परिषद सदस्य), डॉ.कीर्ती पिंगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी श्री चिंतामणी बहुउद्देशीय शिक्षण संस्था, नांदागोमुख चे सचिव प्रफुल नत्थु कष्टी, सदस्य सुरेखा नत्थु कष्टी , शाळेच्या प्राचार्या अर्चना मनोहर काकडे,शिक्षकवृंद व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. प्रमुख अतिथी राजू घुगल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “अशा स्नेहसंमेलनांमुळे लहान मुलांना आत्मविश्वास मिळतो, त्यांची बौद्धिक क्षमता वाढते व मनातील भीती दूर होते.”
यावेळी इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त करत सांगितले की, “मुलांमध्ये प्रचंड टॅलेंट असते. त्यांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी दिली पाहिजे.” ट्विंकल किड्स कॉन्व्हेंट व प्ले-स्कूल सावनेर हे विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी प्रशंसनीय कार्य करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगतदार सुरुवात झाली. भारतातील विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी नृत्ये व सादरीकरणे प्ले-स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आकाश बरवट सर यांनी केले.
शाळेच्या डायरेक्टर, प्राचार्या व शिक्षकवृंद यांच्या कुशल नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन यशस्वीरित्या पार पडले. पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व मोठ्या संख्येतील उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक आनंददायी ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here