गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर
सोनोली गावातील सुशिक्षित तरुणांनी एकत्र येत संपूर्ण गावकऱ्यांना एकत्र करून नंदी बैलपोळ्याचा उत्सव आज गावात आयोजित केला होता.ज्याला गावातील विशेषतः महिलांनी पुढाकार घेत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात मुलाचा हातभार लावला.
याप्रसंगी गावातील प्रौढ प्रतिष्ठित व्यक्तींद्वारे स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांपैकी प्रथम पाच विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.तर सहभागी सर्व मुला मुलींना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले.या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्तपणे सहभाग हे यावेळेसचे विशेष वैशिष्ट्य ठरले.
यावेळी नंदी बैलपोळ्यातील मुला – मुलीमध्ये अधीरा राहुल अंबाडकर प्रथम क्रमांक, काव्या नरेश जी पडोळे द्वितीय क्रमांक, रुद्र दिवाकरजी आंबेडकर तिसरा क्रमांक, एकांश नितीन गोलाईत चौथा क्रमांक,स्वराज आशिष वाघाडे पाचवा क्रमांक मिळाला होता.




