गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
तेलकामठी येथील विठ्ठल मंदिर चौक येथे दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4 ते ६ च्या सुमारास तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन गावातील ज्येष्ठ नागरिक तथा नवयुवक मंडळी यांच्यातर्फे करण्यात आली होते. यावेळी तेलकामठी गावातील मोठ्या प्रमाणात लहान मुला मुलींनी आपल्या नंदीबैलासोबत आपली मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती.
यावेळी मुलं मुली अशा दोन गटांमध्ये लहान मुलांच्या हस्ते हस्ते चिठ्ठी काढून बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी मुलीमध्ये प्रथम पूर्वी दिनेश बावणे तर मुलामध्ये प्रथम धीरज सुनील सोनबरसे,द्वितीय बक्षीस मुलीमध्ये चारवी अक्षय बागडे तर मुलामध्ये तन्वीत मुकेश सोनबावणे,तृतीय बक्षीस मुलीमध्ये कायरा कैकाडे तर मुलामध्ये जयंत जगदीश देशमुख,विशेष बक्षीस मुलीमध्ये अनुष्का किशोर मिरासे तर मुलामध्ये कुणाल गणेश वाडीकर याला देण्यात आले.




