गिरीश आंदे
आज दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी बोरगाव (जंगली), ता. सावनेर, जि. नागपूर येथे त्रिवेणी संगमावर आयोजित करण्यात आलेला आदी महादेव महाशिवरात्री महोत्सव 14 व 15 फेब्रुवारी रोजी भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला आहे. सिंधू संस्कृतीचे रक्षक व समस्त मूलनिवासी भारतीयांचे आद्य दैवत भगवान शंकरजी महादेव यांच्या स्मरणार्थ हा भव्य धार्मिक व सांस्कृतिक सोहळा पार पडला.
सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या या पवित्र स्थळी खडक, निर्मला आणि जटा या नद्यांचा त्रिवेणी संगम होऊन अंबाडोह नदीची निर्मिती झाली आहे. या परिसराला धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व लाभले असून भाविक मोठ्या श्रद्धेने येथे दर्शनासाठी येतात. उमरी धरणामुळे गावाचे पुनर्वसन झाले असले तरी ग्रामस्थांची महादेवांवरील श्रद्धा आजही तितकीच दृढ आहे.
शिवधाम, महादेव गड येथे महादेवाची पुनर्स्थापना करून दरवर्षी आदी महादेव महाशिवरात्री महोत्सव साजरा करण्याची परंपरा ग्रामस्थांनी जपली आहे. यावर्षी पंचक्रोशीतील २५ गावांच्या भजन दिंड्या, कीर्तन, धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महोत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला.
दोन दिवसीय सोहळ्यात परिसरातील आदिवासी बांधव व इतर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. भाविकांनी महादेवाचे दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली व महाप्रसादाचा लाभ घेतला.
महोत्सव समितीचे ॲड. गुजाजी बरडे, डॉ. भगत, अनिल घटे, विनोद घुगल, वर्मा सर, डॉ. अभिविलास नखाते, डॉ. सुनील डोंगरे, गजानन गावंडे, कांचन ढवंगाळे, सुभाष खंगार, प्रवीण बेलेकर, योगीराज धानुरकर, यादव नखाते, अंकुश वैद्य, मोहन वरारकर, समीर नखले, सचिन पराये, दिनेश ढगे, प्रणाली ढोक, भाग्यश्री ॲडलक, हेमंत जोगवे, सुजीत मेश्राम, मनोज राऊत, किशोर कचडे, अंगद कोल्हे, शारदा पुडेकर, गीता धुर्वे, मोहन भलावी, कैलास पाटील, विनोद मोहतकर, रितीक बोंडे, एम. प्रभाकर, वैभव घुगल आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच सावळी, जटामखोरा, पंढरी, जलालखेडा, जोगा, तेलकामठी, तिष्टी (खुर्द), तेलगाव, आष्टी, नांदा, सालई, उमरी, जैतपूर, खुर्सापार, तिडंगी, नरसाळा आदी गावांतील जवळपास २५ भजन मंडळांनी सहभाग नोंदवून संपूर्ण परिसर भक्तिमय केला.
या भव्य आदी महादेव महाशिवरात्री महोत्सवामुळे बोरगाव (जंगली) परिसरात श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक एकतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.




