गिरीश आंदे
धनोजे कुणबी समाज मंडळ, सावनेर व धनोजे कुणबी युवा मंच, नागपूर (ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमाने उपवर-वधू परिचय मेळावा, सत्कार समारंभ व स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहात पार पडला. समाजातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला परिचय सादर केला.
कार्यक्रमाचे उद्घाटन संजय मोवाडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी गंगाधर माडेकर होते. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
मनोहर कुंभारे, विनोद जीवतोडे, रामराव मोवाडे, विवेक मोवाडे, रामभाऊ मुसळे, सुभाष देवाळकर, गजानन आवारी, नंदलाल मोवाडे, ॲड. गजानन आसोले, रोहित मुसळे, कैलास अडकीने आदींनी मनोगत व्यक्त करून समाज एकतेचा संदेश दिला.
कार्यक्रमात सावनेर तालुका धनोजे कुणबी समाजाच्या नवनियुक्त कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळाही पार पडला. नगरपरिषदेचे उपाध्यक्ष राजू घुगल यांची तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.
प्रास्ताविक डॉ. परेश पिंगे यांनी केले. संचालन सुनंदा रडके, प्रतिभा वडस्कर, भुनेश्वर बोबडे व दुर्गेश भुरसे यांनी केले. मीनानाथ सातपुते यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी धनोजे कुणबी समाज मंडळ, सावनेर व धनोजे कुणबी युवा मंच, नागपूर (ग्रामीण) यांच्या कार्याचे कौतुक करून आभार मानले.




