Home सांस्कृतिक व सामाजिक कोथुळना येथे महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

कोथुळना येथे महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

41
0

गिरीश आंदे
माळी महासंघ कोथुळना शाखेच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती श्री दत्त मंदिर, कोथुळना येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास गावातील मान्यवर, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून सामाजिक कार्यकर्ते भागवत काकाजी (मु. उमरी), डॉ. शुभम गजभिये (G. S. योद्धा अकॅडेमी, पारशिवनी) तसेच संदीप भाऊ वाहने (स्पर्धा परीक्षा अकॅडेमी, कोथुळना) उपस्थित होते. माळी महासंघाचे अध्यक्ष, सचिव, सदस्यगण आणि समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिलेल्या शिक्षणाच्या संदेशाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला. त्याअंतर्गत देशबंधू चित्तरंजन हायस्कूल, कोथुळना येथील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू झाल्यापासून दररोज एक तास नवोदय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची निशुल्क सेवा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
या विशेष उपक्रमामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन मिळणार असून,शिक्षणाच्या प्रसाराला चालना मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here