Home Breaking News सावनेर (तिष्टी) काटोल मुख्य मार्गावर “पावसाळ्यात साचले पाण्याचे तळे” तात्काळ दुरुस्ती करण्याची...

सावनेर (तिष्टी) काटोल मुख्य मार्गावर “पावसाळ्यात साचले पाण्याचे तळे” तात्काळ दुरुस्ती करण्याची भाजपचे तालुका उपाध्यक्ष गजानन वाडोदे यांची मागणी ?

109
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
सावनेर (तिष्टी)काटोल मुख्य मार्गावरील सावंगी ते तेलकामठी गावा दरम्यान असलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून कित्येकदा ते खड्डे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत बुजवले सुद्धा आहेत.परंतु रस्त्यातवर खड्ड्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवास्याना व वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात अडचणीना समोर जावे लागत आहे. या खड्ड्यामुळे ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनांचा समतोल बिघडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तसेच हा मार्ग नैसर्गिक नसून या मार्गाने मोठ्या प्रमाणात रोजचा शालेय विद्यार्थी,शेतकरी,कामगार व इतर व्यक्तींचा रोजचा वावराचा भाग आहे.
यात पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने ये-जा करणाऱ्या दुचाकी चालकांना विशेष कसरत करावी लागत आहे. तर रस्त्यांनी ये – जा करणाऱ्या दुचाकी चालकाला रात्रीच्या वेळीस खड्डेमय झालेल्या व त्यात पावसाचे पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघातात होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती देत तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग कळमेश्वर येथील उपअभियंता दमाहे यांना भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष गजानन वाडोदे यांनी केली आहे.
तर सार्वजनिक बांधकाम विभाग कळमेश्वर येथील उपअभियंता सुनील दमाहे यांना संपर्क साधून याविषयी विचारणा केली असता त्यांनी माहिती दिली की याविषयी मी जेईला माहिती दिली असून साचलेले पावसाची पाणी सोकल्याबरोबर ते क्लीन करण्यास सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here