Home Breaking News धापेवाडा येथे महसूल समाधान शिबिरात ६६४ प्रकरणे निकाली – नागरिकांना ‘एकाच दिवशी...

धापेवाडा येथे महसूल समाधान शिबिरात ६६४ प्रकरणे निकाली – नागरिकांना ‘एकाच दिवशी सेवा’चा लाभ

42
0

गिरीश आंदे
राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत नागरिकांच्या तक्रारींचे स्थानिक पातळीवर जलद निवारण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान टप्पा-१’ अंतर्गत धापेवाडा येथे १० एप्रिल २०२६ रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ६६४ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून नागरिकांना ‘एकाच दिवशी सेवा’ या संकल्पनेचा प्रभावी लाभ मिळाला.
शिबिराचे उद्घाटन तहसीलदार विकास बिक्कड यांच्या हस्ते झाले. यावेळी अप्पर आयुक्त राजेश खवले, परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी कुश मोटवानी, सरपंच मंगला शेटे, उपसरपंच मंगेश माले, सामाजिक कार्यकर्त्या प्रिया मानकर, नायब तहसीलदार संदीप तडसे व ज्योती जाधव, गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली कुलकर्णी, मंडळ अधिकारी केशव कुटे, पंचायत विस्तार अधिकारी बबन श्रृंगारे, अभियंता ऋषभ गजभिये, अभियंता यश दिघोरे, अन्नपुरवठा अधिकारी मंगेश ढवळे आदी उपस्थित होते.
शिबिरात सातबारामधील दुरुस्तीची १२ प्रकरणे, डिजिटल सातबारा १८७, आठ-अ उतारा १४६, प्रमाणपत्र वाटप ९८, तसेच ‘एक खिडकी’ व्यवस्थेतून १६६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. याशिवाय भूसंपादनाशी संबंधित कमी-जास्त पत्रके तयार करून ४ प्रकरणे, तसेच अकृषक परवानगी संदर्भातील ३ प्रकरणे पूर्ण करण्यात आली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तलाठी नितेश मोहितकर, गजानन जोंधळेकर, प्रियंका काळे, क्रिस्टीना राफेल तसेच महसूल सहायक आशिष बरडे यांनी विशेष परिश्रम घेतले. याशिवाय ग्रामपंचायत अधिकारी ईश्वर धुर्वे, नितीन कापसे, प्रणीता गणोरकर, सागर ढवळे, हर्षल ढोबळे, विक्रांत आखाडे, दिलीप हेडाऊ, मोनिका मेरखेडे, महेश ढोक आदींनी सहकार्य केले.
या उपक्रमामुळे नागरिकांच्या विविध महसुली तक्रारी तत्काळ निकाली निघाल्याने शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here