Home Breaking News आमदार व पालकमंत्री हे तिष्टी बुजुर्ग येथील लंपी रोगाच्या शेतकऱ्याच्या समस्येवर लक्ष...

आमदार व पालकमंत्री हे तिष्टी बुजुर्ग येथील लंपी रोगाच्या शेतकऱ्याच्या समस्येवर लक्ष घालुन शेतकऱ्याला बाहेर काढेल का – प्रकाश निंबाळकर (शेतकरी तिष्टी बुजुर्ग)

83
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्यात शेतकऱ्यांनी अथक परिश्रम करून देशांमध्ये आपल्या राज्याचे नाव दूध उत्पादकांमध्ये वाढवून क्रांती घडवून आणली आहे. परंतु आजचे शासन मात्र या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करून फक्त राजकारण करण्याचे ध्येय समोर ठेवून शासन चालविताना दिसत आहे मुख्यमंत्र्याचा स्वतःचा जिल्हा असलेल्या नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणचे पशुवैद्यकीय दवाखाने तयार असलेले पशुसंवर्धन केंद्र बंद पडलेले असून सुरू असलेल्या दवाखान्यात डॉक्टर व कर्मचारी नसल्याकारणाने दूध उत्पादकांना त्यांच्या गुरा- ढोरासाठी खाजगी डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागत आहे न परवडणाऱ्या अनेक उपाययोजना पशुंचा जीव वाचविण्यासाठी महागडे औषधी खरेदी करून दूध उत्पादक कर्जबाजारी होत आहे.
असाच एक अनुभव सावनेर तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या अंतर्गत येत असलेल्या तिष्टी (बु.)येथील केंद्र मागील नऊ महिन्यापासून बंद असून कुठल्याही शासकीय स्तरावरून येणारे लसीकरण या गावात झाले नाही गावात जवळपास 50 जनावरांना लम्पी रोगाची साथ झाली आहे परंतु आतापर्यंत शासनाचे कोणतेही अधिकारी किंवा आमदार यांनी या गावांमध्ये येऊन शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. सावनेर आणि कळमेश्वर या दोन्ही तालुक्यात तर हा रोग पसरणार नाही ना ?
ही भीती या भागातील शेतकरी व दूध उत्पादकांना पडली आहे. नुसते दमदार कामगिरी चे बॅनर लावत फिरत असलेल्या आमदार महोदयांनी तसेच ३० वर्षापासून सुनिल केदारांसोबत राहून २५ वर्षात केदारांनी काय केलं? हे भाषणातून विचारणारे भाजपा चे जिल्हाध्यक्ष ज्यांच्या गावापासून अवघ्या पाच कि. मी. अंतरावर असलेल्या तिष्टी (बुजुर्ग) गावात या रोगाचा शिरकाव झाला असतांना त्यांना व आमदारांना या बाबीकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल का ? असा प्रश्न तिष्टी बुजुर्ग येथील शेतकरी प्रकाश निंबाळकर यांनी केला आहे.
या रोगाची लागन भाजपा चे जेष्ठ नेते नारायण गांधी यांच्या जनावरांना झाली होती जे सगळीकडे पसरत आहे. आणि आमदार बैलपोळ्याच्या निमित्ताने बक्षिस वितरण करत फिरत आहे. व टोल नाका हटवल्याचे भाषण ठोकून केदारांवर शिंतोडे उडवतांनाच दिसत आहे. या टोल नाक्याचा व केदारांचा संबंध काय ? शासनाने सुनिल केदारांना टोल नाक्याचा ठेका दिला होता काय? दिलं होत तर सिद्ध करून दाखवा.जेव्हा फास्ट टॅग मधून पैसे कटतात तर काॅलर धरण्याची गरजच कुठे होती. टोल नाका पण भाजपा सरकारनेच उभारला होता. बंद पण तुम्हीच केला यात नविन काय? फक्त स्टंटबाजी करून फेसबुक वर पोस्ट टाकून शेतकरी शेतमजूर दूध उत्पादकाचे प्रश्न सुटेल का ? यावर त्यांनीच विचार करावा. किंवा जनतेला जाहीर पणे सांगावे की सरकारच्या मदतीची वाट बघू नका.आम्ही काही मदत करू शकणार नाही आलेल्या संकटाला तोंड कसे द्यावे हे आमचे शेतकरी शेतमजूर व दूध उत्पादक ठरवून घेतील.
शासनाच्या धोरणानुसार मे महिन्याच्या सुरुवातीलाच लंम्पी रोगाचे लसीकरण जून महिन्यात एकटांग्या चे लसीकरण तसेच तोंडखुरी व पायखुरी चे लसीकरण होते परंतु आमच्या माहितीनुसार आतापर्यंत जिल्ह्यात लम्पी रोगाचे 50 टक्के लसीकरणाचे काम झाले असून शासनाकडून आतापर्यंत लसी उपलब्ध न झाल्याने लसीकरण थांबले आहे “तोंडखुरी आणि पाय खुरीच्या ” लसी आतापर्यंत जिल्हा कार्यालयात आल्या नसल्यामुळे लसीकरण पूर्ण कार्यक्रम बंद असल्यासारखे झाले आहे शासनाकडे लसीच उपलब्ध नाहीत कि,कंत्राटदार ठरला नाहीं ? एकीकडे आमदारांनी स्वत:हा साठी मत मागण्याकरिता धुवां-धार रक्कम फुकट वाटायची व शेतकरी,शेतमजुर,दूध उत्पादकांचे प्रश्न मात्र सोडवण्याची वेळ आली तर शासनाकडे वेळच नाही किंवा शासनाकडे पैसे नाही अशी परिस्थिती सरकारवर आली आहे अशी भावना तिष्टी बुजुर्ग येथील शेतकरी प्रकाश निंबाळकर यांनी केली आहे.
तिष्टि (बू )येथील दवाखान्याला तसेच त्या परिसरात असलेल्या दूध उत्पादकांना शासनाकडून काही न्याय मिळेल का? याची वाट परिसरातील जनता आतुरतेने पाहत आहे. आमदाराची कामगिरी खरोखरच दमदार आहे का? हे या निमित्ताने पहायला मिळेल. तरी पालकमंत्री तथा महसूल मंत्री श्री बावनकुळे यात स्वत:हा जातीने लक्ष घालून या संकटातून शेतकऱ्यांची मुक्तता करतील का?अशी मागणी तिष्टी बुजुर्ग येथील शेतकरी प्रकाश निंबाळकर यांनी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here