Home Breaking News मुख्याधिकारी आकाश सुरडकर यांच्या राजात न.प.कळमेश्वर – ब्राम्हणी कार्यालयापासुनच वाढला शहरवासीयांना डेंग्यू,मलेरियाचा...

मुख्याधिकारी आकाश सुरडकर यांच्या राजात न.प.कळमेश्वर – ब्राम्हणी कार्यालयापासुनच वाढला शहरवासीयांना डेंग्यू,मलेरियाचा धोका !

101
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
नगर परिषद कळमेश्वर – ब्राम्हणी मुख्याधिकारी आकाश सुरडकर यांच्या प्रशासकीय राज्यात नगरपरिषद कळमेश्वर ब्राम्हणी कार्यालयातच पावसाळ्यातील पाण्याची तळे गड्ड्यामध्ये प्लॅस्टिकच्या ड्रम मध्ये साचले आहे. तर शहरातील नाल्या अंशतः बुजलेल्या परिस्थितीत दिसून येत आहे. त्याचप्रमाणे शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग कित्येक दिवसापासून ची साचलेले आहेत.यामुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा जीवघेण्या डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढलेला आहे. डासांच्या समस्येने नगरपरिषद कळमेश्वर-ब्राह्मणीवासीयांची झोप उडाली आहे. लोकांना आपले नित्य काम सोडून डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी वेळ व्यर्थ घालवावा लागत आहे. शिवाय नागरिकांमध्ये जीवघेण्या आजारांची भीती कायम आहे.एकीकडे कळमेश्वर – ब्राह्मणी शहरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे तर दुसरीकडे जनजागृतीचा अभाव आहे. डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने सायंकाळनंतर घर असो की, कार्यालय, कुठेही बसणे कठीण झाले आहे. कार्यालयीन कामकाजात डासांची सर्वात मोठी समस्या निर्माण झाली असून अर्धा वेळ डासांना पळवण्यातच जात आहे.करीता परिसर स्वच्छ तसेच धूर फवारणी करणे आवश्यक आहे.मागीलवर्षी डेंग्यूच्या उद्रेकाने नागरिक त्रस्त झाले होते. डेंग्यूमुळे अनेकांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. सततच्या पावसामुळे पाण्यात डेंग्यू, मलेरियाच्या डासांची पैदास होण्याची दाट शक्यता आहे. करीता आजारांचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी नगरपरिषद प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासक म्हणून मुख्याधिकारी आकाश सुरडकर यांच्या कडून अद्यापही ठोस पावले उचलण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. तर समस्येविषयी नगरपरिषद कार्यालय कळमेश्वर – ब्राह्मणी येथे मुख्याधिकारी आकाश सुरडकर यांच्याकडे कार्यालयात शहरवासी समस्या घेऊन गेल्यास ते शहरवासीयांच्या समस्यांना ऐकून घेतात कार्यालयाच्या बाहेर तासाने तास उभे ठेवून परत आले त्या मार्गाने कर्मचाऱ्याच्या हाताने जाण्याचे सांगत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here