दि.१९ जानेवारी २०२५ रोजी सावनेर येथे धनोजे कुणबी समाज आयोजित धनोज कुणबी युवक मेळावा सावनेर येथील जनता सेलेब्रेशन हॉल येथे पार पडला.यामध्ये संपूर्ण नागपूर ग्रामीण भागातील धनोज कुणबी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यामध्ये सर्व मान्यवर मंडळी यांनी युवकांना मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.त्याचप्रकारे खालील विषयावर आपले मत व्यक्त केले.
धनोज कुणबी युवकांना संगठन ठरणे,ग्रामीण भागातील शेतकरी,युवक,महिला विकास,सावनेर येथे समाज भवन निर्मिती,रोजगार आणि स्वयंरोजगार यांना चालना देणे,या कार्यक्रमात धनोजे कुणबी समाजातील शेती,सामाजिक, राजकीय, उद्योग, शिक्षण क्षेत्रातील मार्गदर्शक व युवक मंडळी उपस्थित होती.
येत्या फरवरी २०२५ रोजी सावनेर येथे आयोजित धनोजे कुणबी वधू वर परिचय मेळावा तसेच समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सत्कार कार्यक्रम निमित्त ही बैठक आयोजित होती.