मौदा :-
‘मौदा येथील डाक विभागाचा कारभार रामभरोसे’ या मथळ्याखाली १९ डिसेंबर २०२४ रोजी प्रकाशित होताच मौदा डाक विभाग व बीएसएनएलचे अधिकारी खळबळून जागे झाले.९ डिसेंबर पासून विस्कळीत असलेली ऑनलाइन सेवा सुरळीत सुरू केली. त्यामुळे येथील नागरिकांनी ‘इंडिया लाईव्ह तेज’ चे आभार मानले.मौदा हे तालुक्याचे ठिकाण आहे. अनेक वर्षांपासून डाक विभागाचा कारभार भाड्याच्या इमारतीत सुरू आहे.मौदा बस स्टॅन्ड परिसरात असलेल्या डाक कार्यालयात पुरेशी पार्किंग व्यवस्था नाही, कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाज करताना अडचण होते. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन समस्या निकाली काढावी, अशी नागरिकांची मागणी होती. १२ दिवसापासून नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाइनची कामे बंद होती. त्यामुळे नागरिकांना मानसिक,शारीरिक त्रास सहन करून आल्यापावली परतावे लागत असे. पूर्वी डाक कार्यालयात सीपी नेटवर्क सुरू होते. आत ती सेवा बंद करून बीएसएनएलचे नेटवर्क जोडण्यात आले. तेव्हापासून नेटवर्क अभावी ऑनलाईनची कामे खोळंबली होती. याकडे ‘इंडिया लाईव्ह तेज’ ने लक्ष वेधले असता ऑनलाइनची कामे पूर्ववत सुरू झाली. त्याबद्दल नागरिकांनी ‘इंडिया लाईव्ह तेज’चे आभार मानले आहे.
Home Breaking News मौदा डाक विभागातील ऑनलाईनची कामे पूर्ववत सुरू नागरिकांनी मानले ‘इंडिया लाईव्ह तेज’चे...




