Home क्रीडा महाराष्ट्रातील ४४ क्रीडा प्रकारांना गुणांकन मिळावे – शिक्षणमंत्र्यांकडे निवेदन

महाराष्ट्रातील ४४ क्रीडा प्रकारांना गुणांकन मिळावे – शिक्षणमंत्र्यांकडे निवेदन

3
0

महाराष्ट्र राज्यातील शालेय क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचा विषय पुढे आणत, शालेय खेळ-क्रीडा संस्था, महाराष्ट्र राज्याच्या वतीने शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांना मंत्रालय, मुंबई येथील निवासस्थानी निवेदन देण्यात आले.
या निवेदनामध्ये सन २०१३ पासून क्रीडा मंत्री व क्रीडा आयुक्त यांच्या मान्यतेने शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी करून घेतलेल्या ४४ क्रीडा प्रकारांना अधिकृत क्रीडा गुणांकन (Sports Marks) देण्याची मागणी करण्यात आली आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे ४ लाख खेळाडूंना होणार असल्याचे नमूद करण्यात आले.
निवेदनात असेही सांगण्यात आले की, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे माजी आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, सुहास दिवसे तसेच कार्यरत आयुक्त शितल तेली-उगले आणि सहसंचालक सुधीर मोरे यांनी या प्रस्तावाला समर्थन देत शिफारस केली आहे.
तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनीही क्रीडा विभागामार्फत यास मान्यता देण्याची शिफारस मंत्रालयास केली आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष शाम भोसले यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये महावीर धुळधर (थांग-ता मार्शल आर्ट), रविंद्र चोथवे (फ्लोअर बॉल), मिनाक्षी गिरी (टेनिस क्रिकेट), रॉकी डिसोजा (तेंग सु डो), अशोक फरगडे व अशोक कदम (बुडो मार्शल आर्ट), संजय सरदेसाई (पॉवर लिफ्टिंग), मिलिंद पांचाळ, वैभव सागवेकर, अभिजित पाटील (फिल्ड आर्चरी), मयुर पांचाळ (रोप स्किपिंग), प्रशांत आहेर (ग्रॅपलिंग), विनोद शिंदे (थाय बॉक्सिंग), भागिरथ सुराग, कश्यप भानुशाली, स्वप्नील सुराग (कुडो), दीपक जांभळे, राहुल भोसले (ट्रेडिशनल रेसलिंग), डॉ. त्रिभुवन सिंग (मॉन्टेक्स बॉल क्रिकेट), डॉ. जितेंद्र लिंबकर (स्पीडबॉल), चंद्रकांत घोडेराव, वैभव शिंदे (ड्रॉप रोबॉल) तसेच शरद वाबळे (मुंबई उपनगर शिक्षक क्रीडा शिक्षक संघटना) यांचा समावेश होता.
संस्थेच्या वतीने शिक्षण विभागाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन या ४४ क्रीडा प्रकारांना क्रीडा गुणांकन लागू करावे,अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here