Home सामाजिक धापेवाडा येथे ‘सहकार भारत गॅस’चे उद्घाटन व शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न

धापेवाडा येथे ‘सहकार भारत गॅस’चे उद्घाटन व शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न

2
0

गिरीश आंदे
कळमेश्वर तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री समितीच्या वतीने धापेवाडा येथे ‘सहकार भारत गॅस’ गोडाऊनचे उद्घाटन तसेच शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला. कार्यक्रमास परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुनील केदार उपस्थित होते, तर उद्घाटन खासदार शामकुमार बर्वे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून बाबाराव पाटील, रविंद्र चिखले, माधव चर्जन, मुक्ता कोकड्डे, नितीन राठी, दिलीप बनसिंगे, गोविंद ठाकरे, बबनराव भड, प्रतिभा पालटकर, फत्तेसिंग मरडवार, निळकंठ भोसकर, श्रावणदादा भिंगारे, महेंद्र डोंगरे, देवानंद कोहळे, नरेंद्र पालटकर, पिंकी कौरती, प्रभाकर भोसले, जयश्री वाळके, विजय भांगे, अनिल गुप्ता व मंगेश माले उपस्थित होते.
कार्यक्रमात ‘सहकार भारत गॅस’ उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष बाबा कोढे, उपाध्यक्ष आशिष देशमुख, व्यवस्थापक अरुण कोल्हे व संचालक मंडळातील वसंतराव राऊत, दामोदर ठाकरे, अशोकराव जिवतोडे, अरविंद दहीकर, प्रकाश मोहोड, राजेंद्र हले, विलास बेंडे, विष्णु ताजने, दिलीप सांबारे, प्रमोद पांडव, किशोर कोठेकर, विजय गिरी, मारोतराव डहाट, शोभाताई कारभारी, मायाताई झोटींग व अण्णाजी चव्हाण यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here