Home क्रीडा गोपाल घटे यांच्या अध्यक्षतेत नगर परिषदेला निवेदन – 400 मीटर धावपट्टीची मागणी

गोपाल घटे यांच्या अध्यक्षतेत नगर परिषदेला निवेदन – 400 मीटर धावपट्टीची मागणी

21
0

गिरीश आंदे
सावनेर शहराच्या मध्यभागी असलेल्या नगर परिषदेच्या मैदानावर 400 मीटर धावपट्टी उभारण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे शहर अध्यक्ष गोपाल ह. घटे यांच्या अध्यक्षतेत नगर परिषदेला निवेदन देण्यात आले.
सध्या या मैदानावर ठोक भाजी बाजार भरत असून, ही जागा क्रीडा विभागाला देताना 400 मीटर धावपट्टी उभारण्याची अट घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि सावनेरकरांची ही एकमुखी मागणी असूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या धावपट्टीमुळे गरीब व झोपडपट्टी भागातील मुला-मुलींना पोलीस, सैन्य व इतर भरतीसाठी सराव करणे सोयीचे होईल. तसेच नगर परिषद हायस्कूल व सुभाष प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनाही याचा मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान, जर ही मागणी मान्य केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी मोहन कानफाडे, तुषार अ. गायकवाड, अमोल डहाट, शेषराव वाढिकर, हेमराज तीबोले, दिलावर शेख, भगवान पारवे, सनी पारवे, आशिष माटे, प्रशांत ठाकरे, सोनबा ठाकरे, रुपेश जामदार, रामकृष्ण मानकर, कृष्णा घटे, वैशाली ग. घटे आणि सुनिता गायकवाड हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here