Home सांस्कृतिक व सामाजिक तिष्टी(खुर्द) येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न

तिष्टी(खुर्द) येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न

75
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर तालुक्यातील तिष्टी (खुर्द) येथे शंकरराव पाटील निंबाळकर व नामदेव पाटील निंबाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विदर्भ रत्न रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन व प्रवचन झाले.यावेळी ढोक महाराज यांनी सांगितले की संतांचे पाय ज्या गावात पडते ते गाव संकट मुक्त होते.म्हणुन संतांच्या सहवासात राहावे व संतांनी सांगितल्या प्रमाणे त्यांचे आचारण करावे.तरच जिवनात खरी मुक्ती मिळते.
यावेळी ह भ प सोपान महाराज काळबांडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली.यावेळी व्यासपीठावर ह भ प ईश्वर महाराज उईके.ह भ प देविदास महाराज ढवळे.मृदंग वादक प्रशांत महाराज गायकवाड.रोशन महाराज केवटे. हार्मोनियम वादक विनायकराव नागमोते. रवींद्र महाराज कडू .रंजन भुजाडे. ईश्वर कुंबरे. प्रवीण निंबुरकर. प्रदीप तावडे. दीपक डेहनकर.श्रावण करोती.सतिश वानखेडे. सूर्यभान दुर्वे. अभय चिंचुरकर.संस्कार निंबुळकर.हर्षल मांडवगडे व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन निंबाळकर परिवार यांच्याकडून करण्यात आला होता.यावेळी कार्यक्रमाच्या शेवटी महाभोजन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here