गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर तालुक्यातील तेलगांव येथील बस स्टॉप जवळील आदर्श क्रिडा मैदान तेलगावं येथे भव्य शंकरपटाचे आयोजन आज सोमवार दि.27 जानेवारी 2025 पासून सुरुवात करण्यात आली असून 28, 29,30 जानेवारी 2025 रोजी शेवट होणार आहे. या शंकरपाटाचे उद्घाटन उद्या मंगळवार, दि. 28 जानेवारी2025 रोजी सकाळी 10 वा. मा.ना. चंद्रशेखर बावनकुळे (महसुल मंत्री महा.राज्य,) यांच्याहस्ते होणार असून कार्यकमाचे अध्यक्ष मा.डॉ.आशिष देशमुख (आमदार सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्र) हे असणार आहे. कार्यक्रमाचे विशेष अतिथी मा.चरणसिंगजी ठाकुर (आमदार काटोल विधानसभा क्षेत्र), प्रमुख उपस्थिती मा. डॉ. राजीव पोतदार (प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा) मा. सुधाकर कोहळे (जिल्हा अध्यक्ष भाजपा नागपूर) मा.मनोहर कुंभारे (माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष)यांची असणार आहे. नववर्षाच्या शुभ पर्वावर सर्व जनतेला आस्वाद लुटण्यासाठी विदर्भ केसरी भव्य शंकरपटाचे आयोजन मा.मनोहर कुंभारे (माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष), यांनी केलें असून प्रथम बक्षीस 1,11,111/- रू. द्वीतीय बक्षीस 81,000/- रु. तृतीय बक्षीस 61,000/-रू. याखेरीज आणखी बक्षीसे प्रदान करण्यात येणार आहे.यावेळी कार्यक्रमाला,मा.रमेश मानकर,मा.अशोक धोटे,मा.ॲड.प्रकाश टेकाडे,मा.रामरावजी मोवाडे,मा.विजय देशमुख,मा.रोहीत मुसळे,मा.बापुसाहेब हळदे,मा.किशोर चौधरी,मा.अरविंद गजभिये,अशोक तादुळकर,संजय टेकाडे,दिलीप धोटे,ईमेश्वर यावलकर,राजु घुगल,संदीप उपाध्याय,मंदार मंगळे,सुरेन्द्र शेंडे,अँड.अरविंद लोधी,देवीदास मदनकर,यादवराव ढोके,किशोर मुसळे सह अनेकांची उपस्थिती असणार आहे.
Home सांस्कृतिक व सामाजिक तेलगाव येथे विदर्भ केसरी भव्य शंकरपटाचे मनोहर कुंभारे मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष...




