Home सांस्कृतिक व सामाजिक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सावनेर तर्फे विचारांचे हळदी कुंकू

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सावनेर तर्फे विचारांचे हळदी कुंकू

54
0

सावनेर –
वैचारिक क्रांतीच्या दिशेने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सावनेरच्या वतीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने व भारतीय गणराज्याच्या 76 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आगळ्यावेगळ्या कार्यक्रम स्त्रियांच्या भरगच्च उपस्थितीत साजरा करण्यात आला. समाजातील विविध अंधश्रद्धा आणि चालीरीतीमुळे विधवा आणि उपेक्षित स्त्रियांना हळदीकुंकू या सणापासून दूर ठेवले जाते. अशा स्त्रियांना महापुरुषांच्या विचाराचे वाण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजामध्ये सन्मानाने जगण्यासाठी आपले आर्थिक नियोजन कसे असावे तसेच आपल्या गरिबीचे आणि दारिद्र्याचे कारणे म्हणजे देवधर्माच्या नावे अंधश्रद्धेला बळी पडून आर्थिक ऐपत नसतानाही जनलाजेस्तव साजरे करीत असलेले धार्मिक विधी स्वतःच्या स्वास्थ्यासोबत खेळून सुद्धा महिलांना पूर्ण करावे लागतात, यापासून सुटका करून घ्यायचे असेल तर पुरोगामी महाराष्ट्रामधील विविध स्त्री चळवळी शी स्वतःला जोडून घेणे किती आवश्यक आहे त्याबद्दलचे उद्बोधन सावनेर शाखेचे अध्यक्ष मनीषा साखरे यांनी केले. समितीचे कार्याध्यक्ष माधुरी बारमासे यांनी मासिक पाळी विषयी होणाऱ्या अंधश्रद्धा, लग्नकार्यात मुलाच्या आईनेच शुभ कार्य करावे, अंगात येणे, यासारख्या विविध अंधश्रद्धेवर प्रकाश टाकला.
उपस्थित महिलांना भेटवस्तु म्हणून पुरोगामी चळवळीतील महानायीकांच्या चरित्र पुस्तिका, फुलांची गजरे वितरित करण्यात आले. विचार परिवर्तनाच्या दिशेने टाकलेल्या वेगळ्या पावलामुळे आजचा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाला प्रमिला इवनाते, मीरा बारमासे, योगिता नेवारे, नंदाबाई राऊत, दीपिका अडागळे, संध्या अडागळे, रंजना पाटील, उषा देशभ्रतार, रोशनी राऊत, सुशीला बाई मिश्रा, बाली मिश्रा,अनिता दुबे, संगीता मिरासे, शालू डाखोळे, लीला अंबुडारे, उर्मिला मसराम सह पन्नास महिलांचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here