गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
स्वस्त धान्य दुकानदार संघाकडून समस्त स्वस्त धान्य दुकानदार बांधवाना कळविण्यात येते आहे की,”शिधापत्रिका शोधमोहीम” फाॅर्मसाठी उत्पन्नाची आवश्यकता नाही. हा विषय आज तहसीलदार श्रीमती रोशन मकवाने आणि अन्न पुरवठा निरिक्षक मंगेश ढवळे यांच्या चर्चेनंतर निकाली निघाला आहे.
म्हणून कोणीही राशन कार्डधारकाला तहसील कार्यालयात पाठवू नये. फक्त फाॅर्म भरून राशन कार्डात सामाविष्ट असलेल्या लाभार्थींचे आधार कार्ड झेराॅक्स, आणि कोणताही एक रहिवासी पुरावा, रेशन कार्ड ची झेराॅक्स प्रत, व पासपोर्ट साईज फोटो अर्जदाराचा फक्त एवढेच कागदपत्र जोडून कुटूंब प्रमुखाची सही अर्जावर घेऊन तो अर्ज जमा करून घ्यावा.
अशी सुचना कळमेश्वर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघाचे अध्यक्ष प्रकाश निंबाळकर,कार्याध्यक्ष प्रमोद बांधेकर, उपाध्यक्ष आनंदराव मानकर,सचिव राजकुमार तागडे यांच्या वतीने करण्यात आली आहे.
Home अन्न व पुरवठा आता कळमेश्वर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना शिधापत्रिका शोधमोहीम फाॅर्मसोबत उत्पन्नाची घेण्याची आवश्यकता...




