Home Breaking News सावनेर तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसकडून तहसीलदार व पोलीस ठाण्यात निवेदन

सावनेर तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसकडून तहसीलदार व पोलीस ठाण्यात निवेदन

128
0

सावनेर
दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सावनेर तालुका काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसतर्फे आज तहसीलदार कार्यालय तसेच सावनेर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.राज्यात झालेल्या अनियमित पावसामुळे खरीप हंगामाचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत. त्यामुळे सरकारने तात्काळ सरसकट कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. हे निवेदन मा.आमदार सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदारांना सादर करण्यात आले.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी नमूद केले की,शेतकऱ्यांवर कर्जाचा प्रचंड डोंगर आहे. सततच्या मुसळधार पावसाने त्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून कर्जफेडीची क्षमता शेतकऱ्यांकडे उरलेली नाही. त्यामुळे सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसावेत,अन्यथा आत्महत्या थांबवणे अशक्य होईल.
दरम्यान,याच दिवशी सावनेर पोलीस ठाण्यातही निवेदन देऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्ते पिंटू महादेवम यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण गंभीरतेने मांडले.काँग्रेसने ही धमकी लोकशाहीविरोधी व कायद्याचा अवमान असल्याचे सांगत संताप व्यक्त केला.”लोकशाहीतील आवाज दाबला जाणार नाही. पोलिस प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करावी,”अशी मागणी या वेळी करण्यात आली.
या वेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. त्यात नितीन राठी,शेषराव रहाटे, बैजनाथ डोंगरे, जानराव केदार, विवेक मोवाडे, प्रकाश खापरे, रवींद्र चिखले, गोविंदा ठाकरे, कपिल वानखेड़े, प्रकाश पराते, गणेश काकडे, राजेश खांगरे, पवन जैस्वाल, अनिल राय, सतीश केदार, हारून शेख, दीपक बसवार, दीपक दलाल, अशोक डवरे, प्रवीण झाडे, सुभाष राहट, मनोज बसवार, गोपाल घटे, सुरेश केने, अमोल केने, राहुल ढोगडे, मोहित बारसकर, स्वप्निल महाजन, सौरभ साबले, हेमंत सोरमारे, ईश्वर घोड़मारे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी इशारा दिला की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जर राज्य सरकारने तातडीने लक्ष दिले नाही आणि राहुल गांधींना धमकी देणाऱ्यावर कठोर कारवाई झाली नाही, तर सावनेर तालुका काँग्रेस व युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास बाध्य होईल. त्याची पूर्ण जबाबदारी ही सत्ताधाऱ्यांवर राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here