Home अपराध साखळी पुरावे जोडत पोलीसांनी कळमेश्वर जळीत ट्रक प्रकरणात जनावरांचा पुरवठा करणाऱ्या २...

साखळी पुरावे जोडत पोलीसांनी कळमेश्वर जळीत ट्रक प्रकरणात जनावरांचा पुरवठा करणाऱ्या २ आरोपींना केले अटक आतापर्यंत एकुण ७ आरोपी अटक

41
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
दिनांक १६/११/२०२५ रोजी पाहटे फेटरी येथे नागपुर ते काटोल रोडवर एक टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच ४० सी.डी ५०९४ याला आग आगल्याने एकुण २९ जनावरे मृत पावली होती. तसेच ८ गोवंश जनावरे जिवंत मिळुन आले होते. नमुद प्रकरणी पोलीसांनी आतापर्यंत ७ आरोपीतांना अटक केली असुन ५ आरोपी दिनांक २०/११/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मध्ये आहे. सदर गुन्हयात साखळी पुरावे जोडत गुप्त बातमीदार आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक १८/११/२०२५ रोजी आरोपी मनोहर भोजराज मनघाटे, रा. सालेकसा जि. गोदींया याला सालेकसा येथुन ताब्यात घेतले. आणि आरोपी इख्तियार कुरेशी मुश्ताक कुरेशी रा प्रवेशनगर, यशोधरा नगर, नागपुर याला यशोधरा नगर, नागपुर येथुन ताब्यात घेतले. नमुद आरोपीतांकडे चौकशी केली असता आरोपी मनोहर भोजराज मनघाटे हा गोंदिया जिल्हयातुन अवैधरित्या जनावरांचा मागणी प्रमाणे पुरवठा करायचा तसेच आरोपी इख्तियार कुरेशी मुश्ताक कुरेशी हा अवैधरित्या जनावरे खरेदी विकी मध्ये मध्यस्थी असल्याची माहीती पोलीसांना प्राप्त झाली. दोन्ही आरोपीला अटक केली आहे. नमुद आरोपीतांना मा. न्यायालयाने दिनांक २१/११/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here