Home Breaking News खापा नगरपालिकेत काँग्रेसला मोठा धक्का कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश – निवडणुकीआधी उलथापालथ

खापा नगरपालिकेत काँग्रेसला मोठा धक्का कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश – निवडणुकीआधी उलथापालथ

65
0

खापा
नगरपालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना काँग्रेससमोर मोठे राजकीय आव्हान उभे ठाकले आहे. तालुक्यातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला असून यामुळे माजी आमदार सुनील केदार यांच्या खाप्यातील संघटन शक्तीला मोठा तडा गेल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
कोराडी (नागपूर) येथील जनसंपर्क कार्यालयात माजी प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी नरेंद्र पिंपळे, अमित राय, विक्की पाटील, संदीप नारनवरे, सचिन राय, चंद्रकांत शेंडे, रणजीत बागडे, अतुल ढोरे, बॉबी गजभिये यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी कमळ हाती घेत भाजपा प्रवेश केला.
नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या प्रवेशामुळे खापा परिसरातील राजकीय वातावरणात चुरस वाढली आहे. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीमुळे झालेले हे स्थलांतर आगामी निवडणूक निकालांवर परिणामकारक ठरू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, 2 डिसेंबरला होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानावर या घडामोडींचा थेट परिणाम पाहायला मिळू शकतो. भाजपात झालेल्या मोठ्या प्रवेशामुळे खाप्यातील स्थानिक निवडणुकीत नवी समीकरणे आकार घेताना दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here