Home Breaking News कळमेश्वर तालुक्यातील निराधारांसाठी डीबीटी मोहीम – श्रीमती रोशन मकवाने (तहसिलदार कळमेश्वर)

कळमेश्वर तालुक्यातील निराधारांसाठी डीबीटी मोहीम – श्रीमती रोशन मकवाने (तहसिलदार कळमेश्वर)

92
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांना अद्याप आधार कार्ड व डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर) नोंदणीच्या त्रुटीमुळे अनुदानाचा लाभ मिळविता आलेला नाही. विशेषतः गंभीर आजारामुळे अंथरुणाला खिळून राहिलेल्या लाभार्थ्यांसाठी आधार व डीबीटी नोंदणी करणे शक्य होत नव्हते.
ही बाब लक्षात घेऊन कळमेश्वर तहसील कार्यालयाच्यावतीने 23 जून 2025 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल आणि वीएलई (ग्रामस्तरीय उद्योजक) हे समन्वय साधून लाभार्थ्यांच्या घरी जाऊन आधार नोंदणी व डीबीटी प्रक्रियेची पूर्तता करणार आहेत. अशा प्रकारच्या घरपोच सेवेचा लाभ अंथरुणावर खिळलेल्या व अत्यंत गरजू लाभार्थ्यांना मिळणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना केंद्रांवर जाऊन नोंदणी करण्याच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तसेच लवकरच त्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा होईल.
या उपक्रमामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजूंना वेळेत आर्थिक दृष्ट्या मदतीचा मोठा आधार मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. तहसीलदार श्रीमती रोशन मकवाने यांनी या उपक्रमात सहभागी असलेल्या सर्व मंडळ अधिकाऱ्यांनी नियोजित वेळेत उपस्थित राहून ही प्रक्रिया प्रभावीपणे पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. या विशेष मोहिमेमुळे मौजेस्तरीय अधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र अधिक सक्रिय होणार असून लाभार्थ्यांना त्वरित व सुलभ सेवा मिळणार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here