Home पुण्यतिथी स्व.अजितदादा पवार जयंतीनिमित्त सावनेरमध्ये भव्य आरोग्य, रक्तदान व वृक्षारोपण अभियान – १,५००...

स्व.अजितदादा पवार जयंतीनिमित्त सावनेरमध्ये भव्य आरोग्य, रक्तदान व वृक्षारोपण अभियान – १,५०० हून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

83
0

गिरीश आंदे
स्व.अजितदादा पवार जयंती महोत्सवानिमित्त जनसेवा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)च्या सावनेर शहर व सावनेर विधानसभा क्षेत्राच्या वतीने भव्य निःशुल्क रोग निदान शिबिर, रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण अभियानाचे आयोजन करण्यात आले. शहराध्यक्ष गोपाल घटे यांच्या पुढाकारातून कृष्णा कॉम्प्लेक्स येथील पक्ष कार्यालयात आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात १,५०० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला.
शिबिरात सुमारे ३०० नागरिकांची विविध आजारांसाठी मोफत तपासणी करण्यात आली. कर्करोग जनजागृती व तपासणी, तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांबाबत मार्गदर्शन, दंतरोग, त्वचारोग तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला. ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र, सावनेरच्या वैद्यकीय पथकानेही शिबिरात मोलाचे योगदान दिले.
जीवनज्योती ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात ११२ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. जनसेवा सप्ताहानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. राजाभाऊ टांकसाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. प्रगती राठोड, जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांत शिवनकर, डॉ. विजय घटे, अमरजी जैन तसेच डॉ. प्रणव इंगोले, डॉ. आदित्य जाधव, डॉ. सोनाली शेळके, डॉ. संदीप गुजर, डॉ. नितेश लाकडे आणि डॉ. निलेश लाकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
वैशाली घटे यांनी आरोग्य जनजागृती, रक्तदान आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. या शिबिरामुळे नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि आरोग्यविषयक जनजागृतीचा लाभ मिळाला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)च्या सावनेर शहर, सावनेर तालुका व सावनेर विधानसभा क्षेत्रातील जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत ठाकरे, विधानसभा अध्यक्ष बाबा झाडे, तालुका अध्यक्ष सुरेंद्र वानखेडे, युवा तालुका अध्यक्ष तुषार गायकवाड, महिला तालुका अध्यक्षा यामिनी मडपे, शहर महिला अध्यक्षा शितल माटे, वैशाली घटे, शहर सचिव भगवान रायकवाड, शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर कावडकर, सोनबाजी ठाकरे, अमोल दाहाट, कृष्णा घटे, गणपती पठाणे, दिलावर शेख, अरविंद भुते, योगेश शर्मा, राहुल खडसे, आशिष माटे, निलेश तागडे, चंद्रभान रहाटे, शांताराम अंतुरकर, भोजराज घटे, राजाभाऊ वाघाडे, रोशन वानखेडे, जामुवंत वारकरी, नितेश कमाले, अनिता सुरकार आणि जयश्री रायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.
शहराध्यक्ष गोपाल घटे यांनी उपस्थित नागरिक, डॉक्टर, रक्तदाते तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था व कार्यकर्त्यांचे आभार मानले. भविष्यातही जनहित,आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनासाठी अशा लोकहितकारी उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here