मौदा
येथील पत्रकार व अ.भा. ग्राहक पंचायत, विदर्भ प्रांत प्रसिद्धी प्रमुख तुकाराम लुटे यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. यानिमित्ताने भाजप शहराध्यक्ष मोरेश्वर सोरते, तालुका उपाध्यक्ष राजू सोमनाथे, कार्याध्यक्ष रमेश कुंभलकर आणि माजी नगरसेवक देविदास कुंभलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार मोरेश्वर सोरते यांनी विशेष कार्यकारी अधिकाऱ्याचे कार्य व कर्तव्य समजावून सांगितले.
नवनियुक्त विशेष कार्यकारी अधिकारी तुकाराम लुटे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, राजू सोमनाथे, मोरेश्वर सोरते, रमेश कुंभलकर आणि देविदास कुंभलकर यांचे मनस्वी आभार मानले.




