दिनांक 13 जून 2025 रोजी सावनेर-कळमेश्वर आणि काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्रातील 30 प्रगतीशील शेतकऱ्यांचे अभ्यासपूर्ण शिष्टमंडळ घेऊन आमदार डॉ. आशिषराव देशमुख नाशिक येथे रवाना झाले. सकाळी 7 वाजता निघून दुपारी 2 वाजता नाशिक मोवाडी तालुका एफ. फार्मर कंपनी, सह्यादी फार्म येथे त्यांनी भेट दिली. सह्याद्रीच्या सर्व संचालकांनी आमदार डॉ. आशिषराव देशमुख व शेतकरी शिष्टमंडळाचे स्वागत केले. ह्यांनतर सह्याद्री फार्म एका एकर पासून तर 120 एकर पर्यंत विस्तारित कसा झाला, याचे प्रत्यक्षित दिले गेले. हया संस्थेचे मुख्य संचालक श्री विलास यांची गरिबीच्या परिस्थितीतून उंच शिखरावर पोहचलेल्या कंपनीची स्थापना 1995 झाली असून आज ती भारतातील पहिल्या क्रमांकाची निर्यात कंपनी सिद्ध झाली आहे.
आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या हया दौऱ्याचा उद्देश नागपूर जिल्हाच्या शेतकऱ्यांना या यशस्वी मॉडेलची ओळख करुन देणे आणि त्यांच्यात एक सकारात्मक बदल घडविणे होय. सह्याद्री फार्मने द्राक्षासह टोमॅटो, डाळिंब, आंबा, संत्रा, केळी, काजू व अनेक पिकांचे उत्पादन करून शेतकऱ्यांच्या उत्पनात मोठी वाढ साधली आहे. हा अनुभव नागपूरच्या शेतकऱ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी ठरला आहे. अशा प्रकारे एकत्र येऊन आपणसुद्धा कृषी व्यवसायात प्रवेश करू शकतो. भारत देश कृषीप्रधान देश असूनसुद्धा शेतकऱ्यांना भरपूर समस्यांना समोरे जावे लागते. यासाठी पुढील काळात नागपूर जिल्ह्यासाठी असंच मॉडेल उभे करण्यासाठी सतत कार्यरत राहून तसेच शेतकऱ्यांना मानसन्मान मिळवून त्यांच्या कष्टाला न्याय देण्याचे ध्येय आमदार डॉ आशिषराव देशमुख यांचे राहणार आहे.
दिनांक 14 जून रोजी अभ्यास दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबादमधील माळीवाडा आणि जालना जिल्ह्यातील अंतरवाला या भागांना भेट दिली. या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष सोबतीने विविध शेती प्रयोगांचा आणि यशस्वी प्रकल्पांचा आढावा घेतला. या भेटीत माळीवाडा येथे अंजीर बागांची पाहणी करताना त्यांनी आधुनिक बागायती तंत्रज्ञान, सिंचन व्यवस्था आणि फळबाग व्यवस्थापनाचे बारकावे समजून घेतले. अंजीर उत्पादनात स्थानिक शेतकरी घेत असलेला पुढाकार आणि त्यातून निर्माण झालेल्या अर्थव्यवस्थेचीही त्यांनी माहिती घेतली.नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला या शिष्टमंडळाने भेट दिली. ही भारतातील सर्वात मोठया बाजारपेठ पैकी एक आहे. येथे शेतकरी व व्यापाऱ्यांशी सवांद साधला.
या दौऱ्याचे वैशिष्ट म्हणजे नागपूरसह विदर्भातील शेतकरी बांधव संपूर्ण दौऱ्यात सोबत आहेत. या अभ्यास दौऱ्याचा उद्देश केवळ निरीक्षण नव्हे तर शेतकऱ्यांच्या थेट सहभागातून त्यांच्या अडचणी, बाजार व्यवस्थेतील त्रुटी, दरांचे प्रश्न, धोरणात्मक मागण्या समजून घेणे हा होता. शेतकरी हा या अभ्यास दौऱ्याचा केंद्रबिंदू आहे. त्यांच्या अनुभवातूनच भविष्याच्या नीती ठरतील. लासलगावमधील बाजार समितीच्या कामकाजची पाहणी करताना अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. हा अभ्यास दौरा म्हणजे केवळ भेटवस्तू नव्हे तर शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून प्रगतिशील बदल घडविण्याची सुरुवात आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांच्या निर्यात विषयक अडचणींसाठी विधानसभेत आवाज उठवणार, असे आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी या दौऱ्यात म्हटले.
या दौऱ्यामध्ये आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या समवेत शेतकरी शिष्टमंडळामध्ये अशोकजी धोटे, बाबा बुऱ्हाण, संजय जीवतोडे, मनोज जवंजाळ, महादेव नखाते, दिनकर राऊत, प्रवीण लोहे, संदीप उपाध्याय, धनंजय मुसळे,सरपंच आशुतोष तभाने, मंगेश कोठाडे, बाळू देशमुख, कुलदीप हिवरकर, शरद जुडपे इत्यादी शेतकरी होते.
Home Breaking News शेतकरीपुत्र आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांचा शेतकरी शिष्टमंडळासह नाशिक, जालना, संभाजी नगर...




