Home सांस्कृतिक व सामाजिक बोरगाव (जंगली) येथे 14 व 15 फेब्रुवारीला भव्य धार्मिक व सांस्कृतिक सोहळा

बोरगाव (जंगली) येथे 14 व 15 फेब्रुवारीला भव्य धार्मिक व सांस्कृतिक सोहळा

55
0

बोरगाव (जंगली) ता. सावनेर, जि. नागपूर येथे त्रिवेणी संगमावर महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन 14 व 15 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले आहे. सिंधू संस्कृतीचे रक्षक व समस्त मूलनिवासी भारतीयांचे आद्य दैवत भगवान शंकरजी महादेव यांच्या स्मरणार्थ हा भव्य धार्मिक व सांस्कृतिक सोहळा संपन्न होणार आहे.
सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या या पवित्र स्थळी सातपुडा पर्वतरांग परिसरातून उगम पावलेल्या खडक, निर्मला आणि जटा या नद्यांचा त्रिवेणी संगम होऊन अंबाडोह नदीची निर्मिती झाली आहे. या नदीवर सन 1971 मध्ये उमरी डॅम धरण उभारण्यात आले. धरणामुळे बोरगाव गावाचे पुनर्वसन झाले असले तरी तेथील नागरिकांची शंकरजी महादेवांवरील श्रद्धा आजही अखंड आहे.
गावकऱ्यांनी शिवधाम, महादेव गड येथे महादेवाची पुनर्स्थापना करून दरवर्षी महाशिवरात्री महोत्सव साजरा करण्याची परंपरा जपली आहे. यावर्षी पंचक्रोशीतील 25 गावांच्या भजन दिंड्या, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक विधी यांच्या माध्यमातून उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा केला जाणार आहे.
परिसरातील आदिवासी बांधव व इतर नागरिक मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी होतात. श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक एकतेचा संगम असलेल्या या महोत्सवासाठी सर्व भक्तांना सादर निमंत्रण देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here