Home सांस्कृतिक व सामाजिक १४ फेब्रुवारीला सावनेर येथे धनोजे कुणबी समाजाचा जिल्हास्तरीय उपवर–वधू परिचय मेळावा

१४ फेब्रुवारीला सावनेर येथे धनोजे कुणबी समाजाचा जिल्हास्तरीय उपवर–वधू परिचय मेळावा

86
0

गिरीश आंदे
धनोजे कुणबी समाज मंडळ, सावनेर व धनोजे कुणबी युवा मंच, नागपूर (ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील उपवर–वधूंना योग्य जीवनसाथी मिळावा तसेच समाजातील ऐक्य व बंधुता अधिक दृढ व्हावी या उद्देशाने जिल्हास्तरीय उपवर–वधू परिचय मेळावा, स्नेह संमेलन व गुणवंतांचा सत्कार समारंभ येत्या शनिवार, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मधुमालती सभागृह, हेटी रोड, सावनेर येथे होणार आहे.
मेळाव्यात जिल्हाभरातील उपवर–वधू, त्यांचे पालक व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. मागील वर्षी झालेल्या उपवर–वधू परिचय मेळाव्याला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. त्या यशस्वी उपक्रमाची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे.
तरी धनोजे कुणबी समाजातील सर्व समाजबांधवांनी कुटुंबासह उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन धनोजे कुणबी समाज मंडळ, सावनेर व धनोजे कुणबी युवा मंच,नागपूर (ग्रामीण) च्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here