सावनेर येथील गांधी चौकात कृषी कायद्याच्या विरोधात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या पुढाकारात येथील तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने शनिवारी दुपारी चक्का जाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनात राज्याचे पशुसंवर्धन,दुग्धविकास व क्रीडा मंत्री सुनील केदार यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी बोलताना ते म्हणाले केंद्र शासन शेतकरी व कष्टकरी लोकांच्या विरोधात असल्याने त्यांना आंदोलन कर्त्यांची परवा नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून या आंदोलनाला अधिक तीव्र करण्याची गरज आहे यावेळी युवक काँग्रेसच्यावतीने रस्त्यावर टायर जाळून व घोषणाबाजी करून केंद्र शासनाचा निषेध केला




