Home Breaking News इलाईट कॉलेज सावनेर येथे अंनिसचा व्यसनमुक्त कार्यक्रम संपन्न

इलाईट कॉलेज सावनेर येथे अंनिसचा व्यसनमुक्त कार्यक्रम संपन्न

104
0

सावनेर :- दि.२४ डिसेंबर २०२४ ला इलाईट कॉलेज येथे अंनिसच्या व्यसनमुक्त कार्यक्रम घेण्यात आला. अनिस तालुकाप्रमुख मनीषा साखरे, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष गौरव आळणे, तालुका संघटक सेवकराम राऊत, प्राचार्या प्रगती डफरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूरच्या सावनेर शाखेतर्फे व्यसनमुक्त अभियान आज दिनांक 24 डिसेंबर 2024 ला महाविद्यालयाच्या हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अंनिसचे तालुका संघटक सेवकराम राऊत यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आमच्या शिक्षण व्यवस्थित कसे बदल व्हावे आणि आमचे विद्यार्थी जागतिक स्तरावर कसे चमकेल यासंदर्भात यथोचित मार्गदर्शन केले. त्यानंतर तालुका प्रमुख मनीषा साखरे यांनी आमचे विद्यार्थी कुठे कमी पडतात त्यावर आम्हाला योग्य दिशा कशी सापडेल यासंदर्भात सविस्तर मांडणी केली. त्याचप्रमाणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष गौरव आळणे ‘यांनी व्यसने आणि नशा या संदर्भात वेगवेगळे चार्ट दाखवून नशेच्या आहारी कसे जाणार नाही तसेच नशेच्या आहारी गेले असतील त्यांना कशाप्रकारे सुधारता येईल याविषयी वेगवेगळे पुरावे देऊन सुंदर मांडणी केली. विद्यार्थ्यांनी शांत चित्ताने या साऱ्या बाबी समजून घेतल्या आणि टाळ्यांच्या गजरात प्रचंड प्रतिसाद दिला.कॉलेजच्या प्राचार्या प्रगती डफरे आपल्या आभार प्रदर्शनात अंनिशची मुक्तकंठाने प्रशंसा केली. आणि या पुढील कार्यक्रम करण्याचे आश्वासन दिले आणि आम्ही तुमच्या सोबत राहू अशी ग्वाही दिली. यापुढे आम्ही व्यसनाच्या आहारी जाणार नाही अशी शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी सावनेर तालुका अंनिसचे कार्यकर्ते नरेंद्र पाटील, विनोद तांदूळकर, कॉलेजचा स्टाफ मनीष महाजन, रुचिका बांबल, आचल कोहळे, सह इतर विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here