Home अभ्यास दौरा जैन इरिगेशन कृषी प्रदर्शनासाठी विदर्भातील 40 पत्रकारांचा अभ्यास दौरा

जैन इरिगेशन कृषी प्रदर्शनासाठी विदर्भातील 40 पत्रकारांचा अभ्यास दौरा

70
0

नागपूर (प्रतिनिधी) :-
विदर्भातील 40 पत्रकारांचा जैन इरिगेशन कृषी प्रदर्शन आणि गांधी तीर्थ या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा अभ्यास करण्यासाठी दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याची सुरुवात 28 डिसेंबर रोजी नागपूर येथून झाली.या दौऱ्याद्वारे पत्रकारांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, शाश्वत विकास, आणि टिश्यू कल्चर प्रयोगशाळेच्या कार्यपद्धतींची माहिती मिळणार आहे. यामुळे कृषी क्षेत्रातील नवीन संधी आणि आव्हाने याबाबत व्यापक दृष्टिकोन निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.
या दौऱ्यात आनंद आंबेकर, देवनाथ गंडाटे, बी. संदेश, प्रवीण नन्नेवार, तुकाराम एस. लुटे, राजू कापसे, सुरेंद्र बिरानवार, सुरेश डांगे, दिलीप घोरमारे, नितेश पाटील, रवि खाडे, संजय वालके, अनिल नौकरकर, दीपक नवडेती, राजू रामटेके, नितेश पाटील, संजय नागदेवते, दयालनाथ नानवटकर, राम वडिभश्मे, दिलीपकुमार इंगोले, हर्षपाल मेश्राम, पंकज एस. चौधरी, सुगत गजभिये, शेखर गजभिये, कैलास निगोट, राजकिशोर गुप्ता, धनगोपाल मुझबैले, सचिन ढेंगरे, नितीन येनुरकर, लेकराम डेंगे, कपिल वानखेडे, पवन वानखेडे, रामदास हेमके,व्ही. पद्माकर, विकास उके, फ्लॅन्श गजभिये, नाना केने आदी सहभागी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here