नागपूर
महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ आणि नवीन नियम २०२५ नुसार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय नागरिक व स्त्रियांसाठी राखून ठेवलेल्या जागांच्या निश्चितीसाठी नागपूर जिल्हा व तालुक्यांमध्ये १३ ऑक्टोबर २०२५ रोजी विशेष सभा घेण्यात येणार आहेत.
या सभांमध्ये सोडत पध्दतीने आरक्षित जागांची कार्यवाही पार पडणार आहे.जिल्हा परिषद नागपूर येथे बचत भवन सभागृहात दुपारी १ वाजता सभा होईल तर तालुका पंचायत समित्या सावनेर, पारशिवणी, रामटेक, मौदा, कुही, कामठी, नागपूर ग्रामीण, कळमेश्वर, काटोल, नरखेड, हिंगणा, उमरेड, भिवापूर या ठिकाणी तहसिल कार्यालयांमध्ये दुपारी १ वाजता सभा घेण्यात आल्या आहेत.
Home Breaking News नागपूर जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये आरक्षित जागांसाठी उद्या विशेष सभा आयोजित




